विना डेबिट कार्डचे ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या सुरक्षित पद्धत

तुम्ही SBIचे ग्राहक असाल तर YONO ऍप वर लॉग इन करा. त्यानंतर रेफरंन्स नंबर आणि डायनॅमिक पीन जनरेट करता येईल. ज्याच्या मदतीने तुम्हाला विना डेबिट कार्ड कॅश काढता येईल. 

Updated: Jun 18, 2021, 08:39 AM IST
विना डेबिट कार्डचे ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या सुरक्षित पद्धत title=
संग्रहित

नवी दिल्ली : आज काल प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असतो. कधीकधी छोट्यामोठ्या गरजांसाठीदेखील वेळ काढणं कठीण होऊन बसतं. अशातच तुम्ही ATM पर्यंत पोहचलात आणि तेथे तुमच्या लक्षात आलं की तुम्ही डेबिट कार्ड सोबत ठेवणं विसरलात. तर मनस्ताप किंवा चिडचिड होऊ शकते. परंतु तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर हा त्रास होणार नाही. तुम्ही विना डेबिट कार्डचे कोणत्याही कॅश काढू शकता. यासाठी तुम्हाला YONO Cash ची सुविधेचा वापर करणं गरजेचं आहे. 

तुम्ही SBIचे ग्राहक असाल तर YONO ऍप वर लॉग इन करा. त्यानंतर रेफरंन्स नंबर आणि डायनॅमिक पीन जनरेट करता येईल. ज्याच्या मदतीने तुम्हाला विना डेबिट कार्ड कॅश काढता येईल. या पीनच्या मदतीने ATMसह POS टर्मिनल आणि कस्टमर सर्व्हिस पॉईंट (CSP)मधूनही कॅश काढता येऊ शकते.

असा करा YONOचा वापर

1. ग्राहकांना 6 डिजिटचा पिन वापरून योनो ऍपवर लॉगइन करावे लागेल.

2. यानंतर योनो पे या बटनावर क्लिक करा

3. योनो कॅश मध्ये योनो पे बटनावर क्लिक करा

4. यानंतर डेबिट अकाऊंट सिलेक्ट करा आणि रक्कम प्रविष्ट करा

5. यानंतर योनो कॅश पीन प्रविष्ट करा आणि नेक्स्टवर क्लिक करा

6. यानंतर टर्म आणि कंडिशन स्विकारून कन्फर्मवर क्लिक करा.

7. योनो कॅश रेफरंन्स नंबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आईडीवर पोहचेल.

8. ATM वर योनो कॅश या पर्यायावर क्लिक करा

9. आता मोबाईलवर रिसिव्ह करण्यात आलेला रेफरंन्स नंबर प्रविष्ट करा 

10. यानंतर योनो कॅश पीन प्रविष्ट करून तुम्ही ATM मधून कॅश काढू शकता.