भारतात Google Map ने शोधलं एक रहस्यमय बेट

 केरळमधील कोचीच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्याजवळ अरबी महासागरात बिनच्या आकाराचे एक बेट दिसत आहे. 

Updated: Jun 18, 2021, 07:58 AM IST
भारतात Google Map ने शोधलं एक रहस्यमय बेट title=

मुंबई : केरळमधील कोचीच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्याजवळ अरबी महासागरात बिनच्या आकाराचे एक बेट दिसत आहे. परंतु हे बेट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या बेटाचा खुलासा गुगल मॅपच्या एका सॅटलाईट फोटोमुळे झाला. हा बेट आकाराने इतका मोठा आहे की, तो पश्चिम कोचीच्या क्षेत्रफळाच्या अर्धा आहे. परंतु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही पाण्याची संरचना आहे, ज्यामुळे असा आकार दिसत आहे. केरळ यूनिवर्सिटी ऑफ फिशरीज एंड ओशनस्टडीजचे (KUFOS) अधिकारी याची चौकशी करण्याचा विचार करत आहेत.

'द न्यूज मिनिट'च्या वृत्तानुसार, चेल्लनम कारशिका टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटी (Chellanam Karshika Tourism Development Society) नावाच्या संस्थेने पत्र लिहल्यानंतर, हे प्रकरण KUFOSच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या महिन्याच्या सुरुवातीला एका फेसबुक पोस्टमध्ये संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅकेएक्स जुलप्पन (KX Julappan) यांनी मॅपच्या फोटोच्या माध्यमातून असा दावा केला की, या बेटाची लांबी 8 किमी आणि रुंदी 3.5 किमी आहे.

बेट कसे बनले ते माहित नाही

KUFOSचे कुलगुरू के. रिजी जॉन यांनी सांगितले की, ही घटना कशी घडली याची शक्यता संघटनांकडून पहिली जात आहे. ते म्हणाले की, "जेव्हा Google मॅपवरून तर पाण्याखालील ते इतर बेटांसारखे दिसते आणि त्याला एक विशिष्ट आकार देखील आहे. परंतु हा बेट कशापासून बनलेला आहे हे आम्हाला माहित नाही. हा बेट वाळू किंवा चिकणमातीचा बनलेला असू शकतो. परंतु खरे काय आहे? हे तर  तपासणीमध्येच कळू शकते. सध्या आम्ही याबद्दल काही सांगू शकत नाही."

रिजी जॉन म्हणाले की, कोचीन बंदरातील खोदकामामुळे अशी संरचना झाली असावी. आम्हाला या संभाव्यतेची चौकशी करावी लागेल. पाण्याचा प्रवाह किंवा लाटा यांसारख्या घटकांमुळे हे घडू शकते. तसेच जॉन म्हणाले की, 'केरळमध्येच दक्षिणेकडील भागावर ऊन्हाची समस्या आहे, ज्यामुळे हे घडले असावे.

आकार वाढत नाही

KUFOSच्य़ा मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते इतर तज्ज्ञांची बैठक घेतली जाईल आणि या बेटाच्या शक्यतेवर चर्चा केली जाईल. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून ही निर्मिती पाहिली जात असल्याचा दावा चेल्लानम कारशिका टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटीच्या (Chellanam Karshika Tourism Development Society)प्रतिनिधींनी केला आहे. तथापि, त्याचा आकार वाढलेला नाही. ते म्हणाले की, या रहस्यमय बेटाबद्दल अनेक प्रश्न आहेत, ज्यांचे उत्तर केवळ तपासातूनच मिळू शकेल.