लग्नाच्या चार महिन्यात पतीने दाखवला रंग, तसले व्हिडिओ दाखवून पत्नीसोबत...

याला नवरा म्हणावं की हैवान! बायकोला डर्टी पिक्चर दाखवुन शारीरीक संबंध ठेवायचा

Updated: Nov 16, 2022, 09:21 PM IST
लग्नाच्या चार महिन्यात पतीने दाखवला रंग, तसले व्हिडिओ दाखवून पत्नीसोबत... title=

अलीगढ : लग्न म्हटलं की दोन कुटूंब एकत्र येतात. नवरा-बायको (Newly married Couple) आपल्या भावी आयुष्याबाबत स्वप्न रंगवतात. लग्न म्हटल की दोन जीवांच मिलन. नात्यातील विश्वास. पण या  घटनेत जे घडलं आहे, ते पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या घटनेत नवऱ्याने लग्नाच्या काही दिवसातचं आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. नवऱ्याचा हा रंग पाहून पत्नीलाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी आता पत्नीने पोलिसात (Police station) धाव घेतली आहे.

या घटनेत नवरा-नवरीचे (Newly married Couple) काहिच महिन्यापुर्वी लग्न झाले आहेत. या लग्नाच्या काही महिन्यानंतर नवऱ्याने खरा रंग दाखवायला सुरुवात केली होती. पत्नीला तिच्या नवऱ्या मागचा हा खरा चेहरा माहित नव्हता. मात्र आता लग्न झाल्यानंतर हा खरा चेहरा तिला कळाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला आहे. 

अश्लील व्हिडिओ दाखवायचा

या घटनेतील नवरा पत्नीशी (Newly married Couple) शारीरीक संबंध ठेवण्याआधी तिला तसले अश्लील व्हिडिओ (Video) दाखवायचा. हे अश्लील व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर तो तिच्यासोबत शारीरीक संबंध ठेवायचा. सुरुवातीला पत्नीला काही वाटले नाही. मात्र प्रत्येकवेळी तिला व्हिडिओ दाखवून तो शारीरीक संबंध ठेवायचा. यामुळे तिचा नवऱ्याच्या अशा प्रकारे वागण्याची किळस यायची. मात्र काही दिवस ती ही घटना सहन करत राहीली. 

सासूकडे तक्रार केल्यावर झाली मारहाण

पत्नीने (Newly married Couple)  याबाबत आपल्या नवऱ्याच्या आईकडे म्हणजेचे आपल्या सासुकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवरून सासूने काही न एकता थेट तिलाच मारहाण केली होती. तसेच तिला नवरा जसे सांगतो तसे करण्याचा सल्ला दिवा होता.
 

एसएसपी कार्यालयात धाव

पत्नीने (Newly married Couple) या गैरवर्तनाला कंटाळून एसएसपी कार्यालयात धाव घेतली होती. तसेच एसएसपी कार्यालयात जाऊन तिने आपल्यावर होत असलेल्या गैरवर्तनाबाबत सांगितले आहे, तसेच एसएसपीकडे तक्रार देखील केली आहे.

महिलेची तक्रार काय?

पीडित (Newly married Couple)  महिलेने सांगितले की, तिचे लग्न याच वर्षी जुलैमध्ये आसिफसोबत झाले होते. सुरुवातीला तिने पतीचा हा अत्याचार सहन केला. मात्र तो सतत तेच करत असल्याने व न सुधारत असल्याने तिने सासूकडे तक्रार केली होती. मात्र सासूने उलट तिलाच मारहाण केल्याने तिने आईसह एसएसपी कार्यालय गाठले आणि तक्रार दाखल केली.

दरम्यान या प्रकरणात अद्याप तरी महिलेच्या (women) पतीला अटक झाली नाही आहे. मात्र आता पोलिस या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ही घटना अलीगढमधील क्वार्सी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.