Virat Kohli : विराट कोहलीचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठींबा?

विराटने कोहलीने (Virat Kohli) टी शर्ट घालून राहूल गांधी यांच्या भारत जोडोचं (Bharat Jodo Yatra) समर्थन केल्याचा दावा केला जात आहे.   

Updated: Nov 16, 2022, 08:55 PM IST
 Virat Kohli : विराट कोहलीचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठींबा? title=

Viral News : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आजचा (16 नोव्हेंबर) 70 वा दिवस आहे.  या यात्रेसंबंधात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा (Virat Kohli) एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. या फोटोत विराटने (Viral Photo) भारत जोडो यात्रेचं टीशर्ट घातलेलं आहे.  (fact check team india cricketer virat kohli wearing congress bharat jodo yatra t shirt know what true what false)

विराटच्या पांढऱ्या टीशर्टवर 'भारत जोडो यात्रा' असं लिहिलंय.  विराटने ही टी शर्ट घालून राहूल गांधी यांच्या भारत जोडोचं समर्थन केल्याचा दावा केला जात आहे. 'विराट कोहलीही भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत', असं एका नेटकऱ्याने ट्विट केलं आहे. 

काय खरं काय खोटं? 

या व्हायरल होणाऱ्या फोटोमागील सत्य आम्ही शोधून काढलं. विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्रामवर 23 सप्टेंबर 2016 रोजी पांढऱ्या टीशर्टमधील फोटो शेअर केला होता.

मात्र विराटच्या या टी शर्टवर 'भारत जोडो यात्रा' असा मजकूर लिहून विराटचा फोटो शेअर करुन खोडसाळपणा केला जात आहे. त्यामुळे विराटचा हा फोटो फेक असल्याचं स्पष्ट झालं आहे.