हैदराबाद : महिला प्राध्यापिकेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करण्याच्या आरोपाखाली एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी ही घटना घडली आहे. ज्यावेळी पीजी हॉस्टेलमध्ये राहणारी महिला प्राध्यापिका बाथरुममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली त्यावेळी एकजण तिचा व्हिडिओ शूट करत होता.
यानंतर महिला प्राध्यापिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली. मग, पोलिसांनी कारवाई करत आरोपी विद्यार्थ्याला अटक केली. आरोपी विद्यार्थी हा हॉस्टेल मालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
महिला प्राध्यापिकाने सांगितले की, कुणीतरी मोबाईल फोनच्या सहाय्याने शूट करत असल्याचं मला दिसलं त्यानंतर मी जोराने ओरडा-ओरड केला. माझा आवाज ऐकूण इतर महिला प्राध्यापिका आणि हॉस्टेलमधील इतर लोक धावत आले. तसेच पोलिसांनाही याबाबत माहिती दिली.
आरोपीने गोल्डन रंगाच्या फोनने व्हिडिओ शूट केल्याचं प्राध्यापिकाने सांगितलं. पोलिसांनी त्यानंतर तपासणी केली असता हॉस्टेल मालकाचा मुलगा चंद्रहास याच्याकडे गोल्डन फोन आढळला.
चंद्रहास याचा मोबाईल फोन तपासला असता पोलिसांना व्हिडिओ मिळाला नाही. मात्र, त्याची कसून चौकशी केली असता व्हिडिओ आपणच शूट करत असल्याचं त्याने कबूल केलं.
Hyderabad: A PG hostel owner's son arrested and sent on judicial remand for filming a woman lecturer while she was taking bath in a bathroom in the hostel.
— ANI (@ANI) December 9, 2017
आरोपी चंद्रहासने सांगितलं की, त्याने १० सेकंदांचा व्हिडिओ शूट केला. मात्र, त्याचवेळी महिला प्राध्यापिकेने पाहिलं आणि आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. मग, मी घाबरलो आणि व्हिडिओ डिलीट केला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चंद्रहास आला अटक करण्यात आली आहे.