फोनवर बोलता बोलता बाईकवर निघाला आणि जीव गमावला

अशी चूक कधी करु नका...

Updated: Jul 11, 2018, 02:45 PM IST
फोनवर बोलता बोलता बाईकवर निघाला आणि जीव गमावला title=

हैदराबाद : हैदराबादमध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीचा अपघाती मृत्यूचा व्हिडिओ आता पुढे आला आहे. हा इसम फोनवर बोलता बोलता आपल्या बाईकवर स्वार झाला. गाडीची कीक मारून विरुद्ध दिशेनं रस्त्याला लागतो न लागतो तोच समोरुन येणाऱ्या एका दुचाकी स्वारानं त्याला जोरदार धडक दिली. अपघातानंतर हा फोनवर बोलणारा तरूण इतका जोरात पडला, की त्याला आता ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. ९ जुलैला घडलेल्या या अपघातानं मोबाईलवर बोलत गाडी चालवण्याचा धोका पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

पाहा व्हिडिओ