नवी दिल्ली : भारतीय वायुसेना पुढच्या महिन्यात या वर्षातील सर्वात मोठा युद्धाभ्यास करणार आहे. यामध्ये भारत आणि फ्रान्सच्या वायुसेना आकाशी युद्धाचे आपले कौशल्य दाखवणार आहेत. या युद्धाभ्यासामध्ये भारतीय वायुसेनेचे सुखोई-30 लढाऊ विमान फ्रान्सच्या राफेल फायटर सोबत उडणार आहे. यावेळी भारतीय सेनेला सध्याची सामग्री आणि भविष्यातील सामग्री परखण्याची संधी मिळणार आहे. फ्रान्स आणि भारताने 1998 साली रणनैतिक भागीदारीवर सह्या केल्या आहेत. तेव्हापासून दोन देशांचे सैनिक अभ्यास करतात.
#WATCH: French fighter aircraft Rafale being recovered onboard French Navy's aircraft carrier FNS Charles de Gaulle, during ongoing Indo-French naval exercise 'Varuna', in the Arabian Sea. pic.twitter.com/pZe4dNtyXZ
— ANI (@ANI) May 10, 2019
जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणारे गरूड 6 युद्धाभ्यास दोन आठवडे चालणार आहे. यासाठी भारतीय वायुसेना साधारण 10 सुखोई फायटर जेट्स सोबत हवेत इंधन भरणारा टॅंकर IL-78 आणि IL 76 अवाक्सचे प्रदर्शन दाखवणार आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेचे 150 हुन अधिक अधिकारी सहभागी होणार आहेत. या गरुड अभ्यासाची सुरुवात 2003 मध्ये ग्वालियर एअरबेसवर झाली. यानंतर अनेकदा भारत आणि फ्रान्समध्ये हा युद्धाभ्यास झाला आहे. याआधी 2014 मध्ये भारताच्या जोधपूर एअरबेसवर हा अभ्यास झाला. या युद्धाभ्यासाने भारतीय वायुसेनेला जगातील दुसरी उत्तम वायुसेना मानल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या काम करण्याची पद्धत आणि उपकरणे शिकण्याची संधी मिळते.
भारत फ्रान्सकडून 26 राफेल विेमान घेणार आहे. याच वर्षात ही विमाने भारतात येऊ शकतात. राफेल विमानांची दोन स्क्वाड्रन बनवली जाणार आहेत. ज्यातील पहिली अंबालामध्ये बनतील. याचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय वायुसेनेचे पायलट आणि ग्राऊंड क्रू फ्रान्समध्ये आहेत. राफेल येण्याने भारतीय वायुसेनेच्या क्षमतेत वाढ होणार आहे. जर वायुसेनेकडे राफेल असते तर बालाकोट हल्ल्यावेळी मिराज एअरक्राफ्ट पाकीस्तानी सीमेत घुसवावे लागले नसते असे खुद्द पंतप्रधानांनी म्हटले आहे. दुरवर अचूक निशाणा साधून उद्धवस्त करण्याची क्षमता राफेलमध्ये आहे.