मुंबई : इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षा 2021 साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. बँकांमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या पदांचे अधिकृत नोटिफिकेशन ibps.in वर पाहता येईल. याच पोर्टलवर पदांसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.( IBPS Notification 2021 )
या प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 4135 पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. बँक ऑफ इंडियामध्ये 588 पदे, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 400 पदे, कॅनरा बँकेत 650 पदे, पंजाब आणि सिंध बँकेत 427 पदे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 620 पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.(IBPS PO Recruitment 2021)
अधिकृत नोटिफिकेशननुसार उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचे स्नातक (Graduation)असायला हवे. उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असायला हवे. सरकारी नियमांनुसार कॅटगरीनुसार सूट मिळते. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन तपासा.
परीक्षा प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्रिलमनरी परीक्षा, मेन्स परीक्षा आणि इंटरव्यूच्या आधारावर करण्यात येणार आहे. उमेदवारांना क्वॉंटिटिव एप्टिट्यूड, रिझनिंग, आणि इंग्रजीच्या एकूण 100 गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील. हा पेपर सोडवण्यासाठी 1 तासांची वेळ असेल. ही परीक्षा 4 डिसेंबर 2021 पर्यंत आयोजित केली जाईल.