'सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार'

 मुस्लिम महिलांना तिहेरी तलाक द्यायला काँग्रेस मोकळीक देणार आहे.  

PTI | Updated: Feb 7, 2019, 04:26 PM IST
'सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार' title=

नवी दिल्ली : मुस्लिम महिलांना तिहेरी तलाक द्यायला काँग्रेस मोकळीक देणार आहे. दिल्लीत अल्पसंख्याक संमेलनात महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुष्मिता देव यांचे खळबळजनक वक्तव्य आहे. सत्तेत आल्यास नरेंद्र मोदी सरकाराचा तिहेरी तलाक कायदा रद्द करणार असल्याचे देव यांनी स्पष्ट केले आहे. हा कायदा म्हणजे मुस्लीम पुरुषांना तुरुंगात पाठवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप सुष्मिता देव यांनी केला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्यावतीने दिल्लीत एक परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.