नवी दिल्ली : नोटबंदीनंतर बॅंकेत १५ लाख किंवा त्याहुन अधिक रुपये जमा करणाऱ्या लोकांसाठी काहीशी वाईट बातमी आहे. तुम्हीही असे केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अशा लोकांविरुद्ध आयकर विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर बॅंकेत १५ लाख रुपयांहुन अधिक रक्कम जमा करणाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
एएनआईच्या नुसार, आयटीने केलेल्या सर्वेतून असे दिसले की, नोटबंदीनंतर डिसेंबर आणि जानेवारीनंतर सुमारे १.९८ लोकांनी आपल्या खात्यात १५ लाखांहुन अधिक रक्कम जमा केली आहे. अशा लोकांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. याबद्दल १५ लाखांहुन अधिक रक्कम जमा करणाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचे उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गेल्या तीन महिन्यात सुमारे ३००० लोकांविरुद्ध टॅक्स चोरी, उशिरा टॅक्स भरणे याबद्दलच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. इनकम टॅक्स विभाग नोटबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-मूल्यांकनावर लक्ष केद्रींत करत आहेत.
CBDT चे चेअरमन सुशील चंद्रा यांनी सांगितले की, परिक्षणच्या आधारावर ई-असेसमेंटची सुरूवात केली आणि तीन महिन्यात सुमारे ६०००० ई-मूल्यांकन केले. ही संख्या वाढेल, अशी आम्हाला आशा आहे. ई-असेसमेंटच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती टॅक्स ऑनलाईन फाईल करु शकते. त्यामुळे त्यांना इनकम टॅक्स ऑफिसच्या फेऱ्या मारव्या लागणार नाहीत.
८ नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटबंदी लागू केली होती. यानंतर ५०० आणि १००० चे नोटा चलनातून रद्द करण्यात आले होत्या आणि नोट बदलण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता.