मुंबई : भारतात अनेक लोकांकडे आपल्या स्वत:च्या गाड्या आहे. चार चाकी नसली तरी जवळ जवळ प्रत्येक घरात एक बाईक किंवा दुचाकी तर नक्कीच आहे. गाडी असल्यामुळे आपली अनेक कामं सोपी आणि वेळेवरती होतात. परंतु तुम्हाला हे देखील माहितच असेल की, नुसतं गाडीच असून चालत नाही आपल्याला तिला सांभाळण्याचा खर्च देखील येतो. म्हणजे नुसतंच पेट्रोल किंवा तिचं मेन्टेनन्स नाही तर. त्याचे अनेक पेपर्स आपल्याला काढवी लागतात. जसे की, PUC, इन्शुरन्स, लायसन्स.
गाडी नवीन असली की लोक गाडीसाठी चांगलावाला इन्शुरन्स काढतात. परंतु यासाठी तुम्हाला जास्त पैसे भरावे लागतात. परंतु याला पर्याय म्हणून किंवा पैसे वाचवण्यासाठी अनेक लोक थर्डपार्टी इन्शुरन्स काढतात. परंतु आता थर्डपार्टी इन्शुरन्स काढणाऱ्या लोकांसाठी देखील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये या इन्शोरन्सचे देखील पैसे वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे वाहचालकांना खिशाला चिमटा बसणार आहे हे मात्र नक्की.
त्यामुळे ज्यांचे इन्शोरन्स आता संपत आलं आहे, त्यांनी ते लवकरात लवकर रिन्यू करा कारण एप्रिल 2022 पासून यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त खर्च येणार आहे. केंद्र सरकारने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) मसुदा अधिसूचनेत ही माहिती समोर आली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर 15% सूट
खाजगी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर, मालवाहकांसह व्यावसायिक वाहनांच्या विम्यावर आपल्याला 15 टक्के सूट दिली जाणार आहे. इको फ्रेंडली वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे.
हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार ७.५ टक्के सूट देण्याची तयारी करत आहे. 1.0 लिटर इंजिन असलेल्या कार, 1,500 cc इंजिन असलेल्या कार आणि 150-350 cc व्यतिरिक्त अधिक शक्तिशाली बाइक्सवर, ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक विमा बेस प्रीमियम भरावा लागेल.
थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय?
बऱ्याच लोकांना थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय असतं, याबद्दल माहिती नसते. परंतु हे जाणून घ्या की, थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत, स्वतःचे वाहनाचे जास्त नुकसान कव्हर करते आणि वाहन मालकांनी ते खरेदी करणे अनिवार्य आहे. तसेच थर्डपार्टीमध्ये समोरच्या व्यक्तीचा जिव गेल्यानंतर त्याला हे कव्हर करते.