नवी दिल्ली : जर तुम्ही रेशन कार्ड धारक आहात. तर सरकारने गरीबांसाठी 4 महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत गरीबांना 5 किलो मोफत खाद्यान्न मोफत दिले जाणार आहे. यासोबतच अन्य अनेक फायदे दिले जाणार आहेत.
रेशन कार्ड गरजेचे
रेशन कार्डचे अनेक फायदे आहेत. रेशन कार्ड सदन असो किंवा गरीब सर्वांसाठी गरजेचे आहे. त्याचा वापर ओळपत्रासारखा देखील करण्यात येतो. संकटकाळात सरकार देशातील गरीब लोकांना मोफत रेशनची सुविधा देत असते.
4 महिने मोफत खाद्यन्न
सरकारने गरीबांना नोव्हेंबरपर्यंत फ्री रेशन देण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील साधारण 80 कोटी लोकांना मोफत रेशनची सुविधा म्हणजेच गरीबांना 5 किलो खाद्यान्न रेशन मोफत मिळणार आहे.