मुंबई : पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात घरात झुरळांची दहशत आपल्याला पाहायला मिळते. घरात झुरळांची संख्या वाढत असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. झुरळांना घरातून पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. बाजारात झुरळांना पळवण्यासाठी अनेक औषधं उपलब्ध असतात. पण हे औषधे हानिकारक ठरू शकतात. पण काही घरगुती उपाय वापरून तुम्ही घरात असलेले झुरळ तुम्ही पळवून लावू शकता.
केरोसीन तेल
केरोसीन तेलाचा वास फार उग्र असतो. यामुळे झुरळ लवकर पळून जातात. पाण्यात केरोसीन तेल घालून फर्शी पुसल्यानंतर देखील झुरळ कमी हावू शकतात.
लवंग
झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही लवंगाचा वापर करू शकता. लवंगाचं वास झुरळांना आवड नाही. त्यामुळे घराच्या कोपऱ्यात कपाटात 4 ते 5 लवंग ठेवू शकता. ज्यामुळे झुरळ पळून जावू शकतात.
कॉफीचे दाणे
कॉफीचे दाणे खाल्ल्यामुळे झुरळांचा नाश होतो. घराच्या ज्या कोपऱ्यात झुरळं असतील त्या ठिकाणी कॉफीचे दाणे ठेवा. यामुळे कॉफीचे दाणे झुरळांना पळवण्यासाठी योग्य उपाय आहे.
बोरिक पावडर
झुरळांपासून मुक्त होण्यासाठी घरी बोरिक पावडरची फवारणी करू शकता. ज्या खोलीत झुरळ असतील तेथे घरी बोरिक पावडरची फवारणी करा. यामुळे बोरिक पावडर झुरळांना पळवण्यासाठी योग्य उपाय आहे.