Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त

Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 14, 2023, 02:40 PM IST
Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त  title=
Income Tax Return Update

Income Tax Return Update : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आलेय. सर्व करदात्यांच्या मनात आयकराबाबत अनेक शंका आणि प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न हा वेगळा असला तरी काही समान मुद्दे आहेत, जे सर्व करदात्यांना उपयुक्त आहेत. गेल्या 10 वर्षांत रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. एकेकाळी स्वतः रिटर्न भरणे अशक्यप्राय गोष्ट होततततती. आता ही गोष्ट अधिक सोपी झाली आहे.

आयकर रिटर्न

समजा तुमचे उत्पन्न करामध्ये येत नसले तरी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फायई करु शकता. इन्कम टॅक्स रिटर्न आता ऑनलाइनमुळे भरणे शक्य झाले आहे. कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि,  अनेकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील जाणीव असली पाहिजे.

पगारदार लोकांसाठी...

पगारदार लोकांसाठी 15 जूनपर्यंत फॉर्म क्रमांक 16 सादर करावा लागेल, ज्यामध्ये पगार आणि कपात केलेल्या करांची माहिती असेल. बहुतेक पगारदार करदात्यांनी त्यांचा फॉर्म 16 आधीच प्राप्त केला असण्याची शक्यता आहे. ज्यांना तो मिळालेला नसेल त्यांनी त्यांच्या कंपनीशी किंवा मालकाशी संपर्क साधून तो मिळवावा.

फॉर्म 16

फॉर्म 16 मिळाल्यानंतर, सर्व सूट आणि भत्ते योग्यरित्या सूचीबद्ध केले आहेत याची खात्री करण्यासाठी तपशील काळजीपूर्वक तपासा. या भत्त्यांमध्ये घरभाडे भत्ता (HRA) आणि रजा प्रवास सहाय्य (LTA) यांचा समावेश आहे. पुढे, तुम्ही हे देखील पुष्टी करावी की तुमच्या करपात्र पगाराची गणना करताना तुमच्या पगारद्वारे गुंतवणूक आणि खर्चाच्या बाबींसाठी VIA च्या अध्यायांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध कपाती विचारात घेतल्या गेल्या आहेत आणि गरजेची आवश्यक कागदपत्रे सबमिट केली गेली आहेत. आयुर्विमा प्रीमियम ते आरोग्य विमा प्रीमियम ते विद्यार्थी कर्ज आणि शैक्षणिक कर्जावरील व्याज वजावटीची श्रेणी असते.