Budget 2023 New vs Old Income Tax Regime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, जुना आणि नवीन कर यापुढे तुम्हाला निवडता येणार आहेत. ( Budget 2023 Income Tax Slabs) याचा काय फायदा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ( Budget 2023 Income Tax Slabs in Marathi)
Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात या महत्वाच्या घोषणा
बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा करसवलतीचा दिसून आला आहे. (Income Tax Regime) गेल्या आठ वर्षांमध्ये करमुक्त उत्त्पन्नाची मर्यादा वाढलेली नव्हती. 2014 मध्ये मोदी सरकारने टॅक्सची मर्यादा 2 लाख रुपयांवरुन अडीच लाख रुपये केली होती. मात्र त्यानंतर टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. ही मर्यादा यंदा तरी वाढवावी अशी मागणी नोकरदारांनी केली होती. दरम्यान, ही मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा असताना थेट 7 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता यापुढे 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले आहे.
निर्मला सीतारामण यांनी करदात्यांसाठी नवीन कर स्लॅब सादर केला. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना जुन्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त कर सवलती देण्यात आल्या आहेत. नवीन कर स्लॅब 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. आता कोणता स्लॅब निवडायचा हे तुम्ही तेव्हाच ठरवू शकता. जेव्हा तुम्हाला दोन्हीचे फायदे आणि तोटे माहीत असतील. या दोन्हीचे फायदे आणि तोटे काय आहेत हे देखील जाणून घ्या.
नवीन टॅक्स स्लॅब नुसार करप्रणाली खालील प्रमाणे असणार आहे.
असा असेल नवीन टॅक्स स्लॅब
Income Tax
0 ते 3 लाख 0 %
3 ते 6 लाख 5 %
6 ते 9 लाख 10 %
9 ते 12 लाख 15 %
12 ते 15 लाख 20 %
15 लाखांपेक्षा जास्त 30 %
करदात्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नवीन टॅक्स स्लॅब निवडून तुम्ही आयटीआर भरला आणि पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन टॅक्स स्लॅबमध्ये अधिक फायदा मिळेल असे वाटत असेल, तर आरामात त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याचप्रमाणे, आपण उलट देखील करु शकता. परंतु हा लाभ विशिष्ट वर्गाच्या करदात्यांना दिला जातो. नोकरदार व्यक्ती नवीन स्लॅबवरुन पुन्हा जुन्या स्लॅबवर स्विच करु शकतात. ज्यांना पगार , भाडे किंवा इतर स्त्रोतांमधून उत्पन्न आहे त्यांच्याबरोबर ते प्रत्येक वेळी त्यांचा कर स्लॅब बदलू शकतात. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही तुमचा कर स्लॅब एकदाच बदलू शकता, हे लक्षात घ्या.