मुंबई : पाच राज्यांमधील विधानसभा निडणुका पार पडताचं महागाईच्या झळा लागायला सुरूवात झाली आहे. सरकारी तेल केपन्यांना सगल दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. गेले 18 दिवस पेट्रोल डिझेलच्या दरांत कोणत्याही प्रकारची वाढ नोंदवण्यात आली नव्हती. या काळात क्रूड ऑईल मार्केटच्या किंमतीत लक्षणीय हालचाली झाल्या. 18 दिवसांनंतर मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा बुधवारी वाढ करण्यात आली आहे.
बुधवारी देशात पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेलचे दर 21 पैसे प्रति लिटरमागे वाढवण्यात आले आहेत. तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
4 मेट्रो शहरांत Petrolचे दर
शहर आजचा दर
दिल्ली 90.74
मुंबई 97.12
कोलकाता 90.92
चेन्नई 92.70
4 मेट्रो शहरांत डिझेलचे दर
शहर आजचा दर
दिल्ली 81.12
मुंबई 88.19
कोलकाता 83.98
चेन्नई 86.09
पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.