Independence Day: भारताला 1947 साली स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान काय काय घडलं?

How India Got Independence 1947: 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली आणि देश कायमचा सोडला.भारताला नेमकं स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान कोणत्या प्रमुख घडामोडी घडल्या याबद्दल जाणून घेऊयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 14, 2023, 07:05 AM IST
Independence Day: भारताला 1947 साली स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान काय काय घडलं? title=
पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं होतं

How India Got Independence 1947: भारत 2023 साली 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या वर्षी आपल्या स्वांत्र्यदिनाची थीम 'राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम' अशी आहे. सरकारच्या 'आझादी का अमृत मोहत्सव' अंतर्गत हा उत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याचा पहिला संघर्ष 1857 मध्ये झाला. याला 1857 चा उठाव किंवा शिपाई विद्रोह असे म्हणतात. या उठावाचं नेतृत्व मंगल पांडे यांनी केले होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, बहादूर शाह जफर, तात्या टोपे आणि नाना साहिब हे इतर लढवय्ये या लढ्यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनी  1857 मध्ये ब्रिटिश सैनिकांचा प्रतिकार केला होता.

पहिला राष्ट्रध्वज, जन गण मन् अन्...

1900 च्या दशकात स्वदेशी चळवळ सुरु झाली. याच पद्धतीच्या भारत सरकारच्या सध्याच्या प्रयत्नांना 'मेक इन इंडिया' नाव देण्यात आलं आहे. लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक हे स्वदेशी चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. सर्वात आधी टिळकांनीच परदेशी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून केवळ भारतीय वस्तू वापरण्याची मोहीम सुरू केली. नंतर बाळ गंगाधर टिळक आणि जेआरडी टाटा यांनी भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी 'बॉम्बे स्वदेशी को-ऑप स्टोअर्स कंपनी लिमिटेड'ची स्थापना केली. भारताचा पहिला राष्ट्रध्वज 1904 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी तयार केला होता. लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचे 3 आडवे पट्टे असलेला भारताचा राष्ट्रध्वज प्रथमच कोलकात्याच्या गिरीश पार्कमध्ये फडकवण्यात आला. भारताचा आज जो राष्ट्रध्वज दिसतो त्याची प्राथमिक रचना 1921 मध्ये आंध्र प्रदेशातील शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला होता. 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी 'भारतो भाग्यो बिधाता' हे गाणे रचले. ज्याचे नंतर 'जन गण मन' असे नामकरण करण्यात आले. भारताच्या संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी हेच गीत भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं. भारताचा सध्याचा राष्ट्र ध्वज अधिकृतपणे 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी तो फडकवण्यात आला.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर 1757 ते 1857 दरम्यान राज्य केलं. 200 वर्षांच्या ब्रिटीश राजवटीनंतर भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली आणि देश कायमचा सोडला. भारतामधील ब्रिटीश शासन हे 1858 ते 1947 दरम्यान होतं. भारताला नेमकं स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान कोणत्या प्रमुख घडामोडी घडल्या याबद्दल जाणून घेऊयात...

1940 :

राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन मौलाना आझाद अध्यक्षतेखाली झालं. यामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. यानंतर कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा ठराव मांडण्यात आला. मार्च महिन्यामध्ये मुस्लिम लीगचे लाहोरमध्ये अधिवेशन पार पडलं. यामध्ये मुस्लिम बहुसंख्य स्वतंत्र राज्ये बनववण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष बॅरिस्टर जीना होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये राष्ट्रीय सभेची वैयिक्तक सत्याग्रह चळवळ सुरू झाली. विनोबा भावे हे पहिले वैयिक्तक सत्याग्रही होते. याच वर्षी उधमसिंगने जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असलेल्या मायकल ओडवायरची हत्या केली.

1941  :

सुभाषचंद्र बोस भारतामधून जर्मनीकडे रावाना झाले. व्हॉइसरॉय यांच्या कर्यकारी मंडळाची मुदत वाढवण्यात आली. 7 डिसेंब रोजी जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला. सुभाषचंद्र बोल यांनी आझाद हिंद फौजेची सिंगापूरमध्ये स्थापना केली. यासाठी रासबिहारी बोल यांना जपान व दक्षिणपूर्वी आशियामधील लष्करी अधिकाऱ्यांना सहाय्य केलं. फेब्रुवारी महिन्यात चीनचे पंतप्रधान चॅगकाय शेक यांनी भारताला भेट दिली होती.

1942  :

29 मार्च जोरी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली. 8 ऑगस्य रोजी चले जाव चळवळीचा मसुदा तयार करण्याचे काम पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालं. मुंबईमधील ग्वालिया टँक मैदानामधील राष्ट्रीय सभेच्या खास अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी 'करो या मरो'चा मंत्र दिला. 9 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु आणि इतर राजकीय नेत्यांना अटक करण्यात आली. शिरीष कुमार यांना नंदुरबारमधील गोळीबारामध्ये वीरमरण आलं. महाराष्ट्रातील सातारा, उत्तर प्रदेशमधील बालिया, बंगालमधील तामलूक, ओडिशामधील तालचेर आणि कर्नाटकमधील धारवाडमध्ये प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शेड्यूल कास्ट फेड्रेशनची स्थापना केली. चिमूरमध्ये पोलिसांचे हत्याकांड झाले. 

1943  :

गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय म्हणून लाँड वॅव्हेल यांची नियुक्ती करण्यात आली. सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवण्यात आलं. सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये हंगामी हिंदी सरकारची स्थापना केली. पंजाब आणि बंगाल प्रांतामध्ये दुष्काळामुळे 30 लाख लोक मृत्यूमुखी पडले. 

1945  :

25 जून रोजी शिमला परिषद पार पडली. राष्ट्रसभेचे नेतृत्व मौलाना आझाद यांच्याकडे देण्यात आले. मुस्लीम लीगचे अध्यक्षपद बॅरिस्ट जीना यांच्याकडे सोपवण्यात आलं. 10 जुलै रोजी मजूर पक्षाचे अटॅली इंग्लंडचे पंतप्रधान झाले. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर राजद्रोहाचे खटले दाखल करण्यात आली. दिल्लीच्या लालकिल्यामध्ये चौकशी सुरु झाली. पंडित जवाहरलाल नेहरु, भूलाभाई देसाई यांनी वकील म्हणून या खटल्यांमध्ये सैनिकांची बाजू मांडली. याच वर्षी दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. 

1946  :

राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मीरतमध्ये पार पडले. आचार्य कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलं. फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईत नौदलाने बंड पुकारले. लवकरच भारताला पूर्ण स्वातंत्र्य देणार अशी घोषणा ब्रिटीश पंतप्रधान अॅटली यांनी ब्रिटीश पार्लामेंटमध्ये केली. ब्रिटीश पार्लामेंटमध्ये यासंदर्भात थ्री मिनिस्टर मिशन संमत झाले. याअंतर्गत सर पेट्रिक लॉरेन्स हे भारतमंत्री म्हणून देशात दाखल झाले. त्यांच्याबरोबर सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि मिनिस्टर अलेक्झँडर भारतात आले. 16 मे रोजी कॅबिनेट मिशन योजना सुरु झाली. जुलै महिन्यात घटना समितीच्या निवडणुका झाल्या. 24 ऑगस्ट रोजी हंगमी सरकारची स्थापना झाली. पंडित नेहरु या मंत्रीमंडळाचे प्रमुख होते. मुस्लीम लिगने सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली होती. 9 डिसेंबर रोजी घटना समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 207 सदस्य उपस्थित होते.

1947 :

गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय लॉर्ड लुईस माऊंटबॅटन हे 20 फेब्रुवारी भारतात दाखल झाले. अॅटली यांनी 1948 च्या जून महिन्याआदी ब्रिटीश भारत सोडतील असं जाहीर केलं. 3 जून रोजी माऊंटबॅटन यांनी फाळणीची योजना जाहीर केली. 12 जुलै रोजी भारताचा कायदा संमत झाला. 14 ऑगस्ट रोजी भारताची फाळणी झाली आणि मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची निर्मिती झाली. 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र मिळालं. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाला उद्देशून भाषण केलं होतं.