'भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये झाली चर्चा'

 दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूने पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 12, 2018, 01:22 PM IST
'भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये झाली चर्चा' title=

नवी दिल्ली : दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूने पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी एकमेकांशी चर्चा केल्याचं आपल्या परराष्ट्रखात्यानं स्पष्ट केलं आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नसीर खान जाज्वा यांच्यात दोन्ही देशांच्या संबंधांविषयी चर्चा केल्याचं भारतानं मान्य केलं आहे.