भारत आणि ब्रिटेनमध्ये एकत्र युद्धाभ्यास

भारत आणि ब्रिटेनचं सैन्य एकत्र युद्धाभ्यास करणार आहे. यासाठी १०० हून अधिक ब्रिटीश सैनिक भारतात आले आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 30, 2017, 10:30 AM IST
भारत आणि ब्रिटेनमध्ये एकत्र युद्धाभ्यास title=

जयपूर : भारत आणि ब्रिटेनचं सैन्य एकत्र युद्धाभ्यास करणार आहे. यासाठी १०० हून अधिक ब्रिटीश सैनिक भारतात आले आहेत.

बुधवारी सकाळी हे जवान जयपूर विमानतळावर पोहोचले. भारतीय लष्काराच्या अधिकाऱ्यांनी यावेळेस त्यांचं स्वागत केलं. औपचारीक गोष्टी झाल्यानंतर हे सैन्य युद्धाभ्यासासाठी महाजन येथे पोहोचले.

महाजनमध्ये १ डिसेंबर पासून भारत आणि ब्रिटीश सैनिकांमध्ये एकत्र युद्धाभ्यास होणार आहे. अजेय वॉरिअर २०१७ असं या युद्धाभ्यासाला नाव देण्यात आलं आहे.