भारतात 2 लाख 45 हजार करोडपती, 2022 पर्यंत होणार 3 लाख 72 हजार

भारतातील करोडपतींची संख्या 2.45.000 वर पोहोचली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती 5,000 अरब डॉलर इतकी आहे. क्रेडिट स्विसच्या एका अहवालात ही बातमी पुढे आली आहे. 2022 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल 3,72,000 वर पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 14, 2017, 09:43 PM IST
भारतात 2 लाख 45 हजार करोडपती, 2022 पर्यंत होणार 3 लाख 72 हजार

नवी दिल्ली : भारतातील करोडपतींची संख्या 2.45.000 वर पोहोचली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती 5,000 अरब डॉलर इतकी आहे. क्रेडिट स्विसच्या एका अहवालात ही बातमी पुढे आली आहे. 2022 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल 3,72,000 वर पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

धक्कादायक अहवाल

क्रेडिट स्विसच्या जागतीक संपत्ती अहवालानुसार 2,000 सालापासून भारतातील नागरिकांच्या संपत्तीत प्रतिवर्ष 9.9 टक्क्यांची वाढ होताना दिसत आहे. ही वाढ जागतीक संपत्ती वाढीच्या तुलनेत 6 टक्के इतकी आहे. तसेच, दरडोई उत्पान्नवाढीत हे प्रमाण 2.2 इतके आहे. भारतीय संपत्तीत झालेली 541 अरब डॉलरची वाढ ही जागतिक तुलनेत एका देशाच्या वाढीच्या तुलनेत आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी वाढ आहे.

संपत्तीचा मोठा हिस्सा मर्यादीत लोकांकडे

अहवालात म्हटले आहे की, 'भेलेही भारतात संपत्तीच्या प्रमाणात वाढ झाली असेल. पण, यात प्रत्येक भारतीयाचा हिस्सा नाही. देशातील नागरिकांकडे असलेली संपत्ती अद्यापही चिंतनाचा विषय आहे. अहवालातील आकडेवारीवरून दिसते की, सुमारे 92 टक्के लोकांकडे 10,000 डॉलरपेक्षाही कमी संपत्ती आहे. तर, दुसऱ्या बाजूला संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांकडेच आहे.' 

स्वित्झरलंड क्रामांक एकवर

अहवालानुसार भारतातील खासगी संपत्तीचा सर्वात मोठा हिस्सा जो जमीन आणि रिअल इस्टेटच्या रूपात आहे. जो एकूण संपत्तीच्या 86 टक्के आहे. एकूण मालमत्तेतील खासगी कर्जाचा हिस्सा 9 टक्के इतका आहे. प्रति व्यक्ती संपत्तीच्या हिशोबाने स्वित्झरलंड पहिल्या स्थानावर आहे. स्वित्झरलंडमध्ये प्रतिव्यक्ती संपत्ती 2017 मध्ये 5,37,600 अमेरिकी डॉलर इतकी आहे. तर, 4,02,600 अमेरिकी डॉलरसोबत ऑस्ट्रेलिया आणि  3,88,000 डॉलर सोबत अमेरिका अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.