भारतात बनतंय डबल इंजिनचं स्टेल्थ लढाऊ विमान

जाणून घ्या स्वदेशी विमानाची खासियत 

Updated: Oct 14, 2019, 08:20 AM IST
भारतात बनतंय डबल इंजिनचं स्टेल्थ लढाऊ विमान title=
प्रातिनिधीक फोटो

मुंबई : भारतात आता एक असं विमान बनतंय जे अगदी वर्ल्ड क्लास असणार आहे. लवकरच हे विमान भारताच्या एका एअरबेसवर उडाण घेताना दिसणार आहे. या विमानाचं नावं आहे एडवांस्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे AMCA. दोन इंजिन असलेलं हे विमान कोणत्याही ऋतूमध्ये वापरलं जाऊ शकतं. हे फायटर मल्टीरोल असल्यामुळे हवेत अतिशय सुपरपावर असणार आहे. 

महत्वाचं म्हणजे जमिनीवर हल्ला करण्यासाठी किंवा हवेतून बॉम्ब वर्षाव करण्यासाठी हे विमान सज्ज असणार. आता भारतीय वायुसेनेत (IAF) मध्ये शक्ती, सुखोई-30 एमकेआय, मिराज 2000, जॅगवार आणि तेजस सारखे लढाऊ विमान आहेत. यांची जागा लवकरच स्टेल्थ लढाऊ विमान घेणार आहे. Hindustan Aeronautics Limited आणि Aeronautical Development Agency मिळून हे विमान बनवत आहेत. 

वायुसेनेला या विमानाची गरज का?

 स्टेल्थ म्हणजे एक असं विमान जे राडारला धोका देऊ शकतं. हे फायटर विमान आपल्याला दिसणार पण मिलिट्रीचे डोळे असलेल्या राडारला दिसणार नाही. असं नाही की हे विमान पूर्णपणे लपतात पण हे विमान राडारच्या मदतीने शोधणं आणि त्यांच्यावर निशाणा साधणं कठीण होणार. 

अमेरिका, रूस, चीन आणि जपानप्रमाणेच आता भारतदेखील स्टेल्थ विमानावर काम करत आहे. आता स्वदेशी लढाऊ विमान तेजसची फ्लाइट टेस्टिंग सुरू आहे. याच दरम्यान भारताने AMCA म्हणजे Advanced Medium Combat Aircraft वर काम सुरू केलं आहे. 

AMCA चं वेगळेपण जाणून घेऊया 

AMCA च्या पाचव्या आवृत्तीची भारत आणि रूस 2007 पासून तयारी करत आहेत. 
AMCA मल्टीरोल स्टेल्थ विमान असणार आहे. 
AESA राडारसोबत दोन इंजिन असणार आहेत. जे 3D thrust vector controlसोबत असणार आहे.