फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार भारत भ्रष्टाचारात अव्वल स्थानी

'भ्रष्टाचार मुक्त' भारत या अजेंड्यावर भाजपने २०१४ सालची लोकसभा निवडनूक जिंकली.

Updated: Sep 1, 2017, 05:47 PM IST
फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार भारत भ्रष्टाचारात अव्वल स्थानी  title=

मुंबई : 'भ्रष्टाचार मुक्त' भारत या अजेंड्यावर भाजपने २०१४ सालची लोकसभा निवडनूक जिंकली.

त्यानंतर अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी अनेक योजना पुढे आणल्या.पण तरीही चित्र काही फारसे सुधारलेले दिसत नाही. 

          फोर्ब्सने नुकतीच आशिया मधील  भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर केली. त्यानुसार आशिया खंडात भारत भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे.  ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून याबद्दलचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या सर्वेक्षणानुसार भारत भ्रष्टाचारामध्ये अव्वल स्थानी आहे.  

भारताच्या तुलनेत  चीन, पाकिस्तान, बांग्लादेश या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी आहे. भारतात सुमारे  ६९ टक्के भ्रष्टाचार असल्याचे सर्वेक्षण आहे. त्यामुळे मोदींचे 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार आहेत. भ्रष्टाचार ही आशिया खंडातील एक प्रमुख समस्या आहे. आशियातील व्हिएतनाम, थायलंड, पाकिस्तान, म्यानमार आणि भारत या पाच देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय जास्त आहे.  यामध्ये भारत अव्वल स्थानी आहे तर त्यानंतर व्हिएतनाम, थायलंड, पाकिस्तान या देशांचा क्रमांक लागतो. पाकिस्तानामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण केवळ ४० % आहे. 

शाळा, रुग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक व्यक्तींनी या क्षेत्रातील कामे करुन घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची माहिती दिली आहे  असे फोर्ब्सने लेखात म्हटले आहे. यासोबतच फोर्ब्सने भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी  नरेंद्र मोदींचे कौतुकदेखील केले आहे.