10वी पास आहात? पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखत देण्याचीही गरज नाही

India Post GDS Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. लवकरच, टपाल विभागात मोठी भरती निघाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 3, 2023, 07:07 PM IST
10वी पास आहात? पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखत देण्याचीही गरज नाही title=
India Post GDS Recruitment 2003 For the posts Gramin Dak Sevaks

India Post GDS Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोस्टात तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. कोणतीही परीक्षा न देता तुम्ही थेट पोस्टात रुजू होऊ शकणार आहात. मात्र त्यासाठी काय प्रक्रिया आहे. हे जाणून घेऊयात. या पदासाठी महाराष्ट्रात एकूण 76 पद रिक्त आहेत. 

भारतीय टपाल विभागाने ग्रामीण सेवक (GDS) पदांसाठी भरती  करणार आहेत. (India Post GDS Recruitment) साठी अर्ज करण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारिख 23 ऑगस्टपर्यंत आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार India Postच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline च्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. 

उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत त्यांचा अर्ज दुरुस्त करु शकता. India Post GDS Bharti 2023अंतर्गंत 30041 पदांसाठी ही भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. तर, तुम्हालाही भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर खालील गोष्टी लक्षात घ्या. 

 India Post GDS Bharti 2023 अंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या पदांची संख्या: या भरती प्रक्रियेत 30041 इतक्या ग्रामीण डाक सेवकांची पद भरण्यात येणार आहेत. 

वयोमर्यादाः या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावं 

शैक्षणिक पात्रता

भारत सरकार किंवा राज्य सरकारने मान्यता दिलेल्या शाळेतून गणित व इंग्रजी हे विषय घेऊन 10वी उत्तीर्ण झाल्याचे माध्यमिक विद्यालय परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असावे. दहावी-बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज करु शकतात. तुमच्या दहावींच्या गुणांनुसार उमेदवारांची निवड होणार आहे. त्याचबरोबर, प्रादेशिक भाषा आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे.

उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. महिला, तृतीयपंथी आणि सर्व एससी\एसटी उमेदवारांसाठी निशुल्क असणार आहे. 

कसं कराल अप्लाय

India Postच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा
होमपेजवर रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा
रजिस्टर केल्यानंतर नोकर भरतीचा अर्ज भरा
त्यानंतर 100 रुपये शुल्क भरा
सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा
अर्ज सबमिट केल्यानंतर या अर्जाची एक प्रिंट काढून ठेवा 

किती असेल पगार

ग्रामीण डाक सेवक या पदासांठी १0,000 ते 24,470
ब्रांच पोस्ट मास्टर या पदांसाठी- 12,000 ते 29,380