नवी दिल्ली: सरकारी नोकरी करण्याची संधी कोण सोडेल आणि कोणाला नको असते सरकारी नोकरी. कोरोना आणि लॉकडाऊन यामुऴे अनेक ठिकाणी बेरोजगारी आली आहे. याच दरम्यान सरकारकडून काही भरती सुरू आहेत. 10 वी पास असणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये (India Post Recruitment 2021) 2357 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर आजच करा.
पश्चिम बंगाल सर्कलमध्ये ग्रामीण विभागात पोस्टाची (India Post Recruitment 2021) भरती आहे. 2357 पदांची ही भरती आहे. पोस्टाच्या ऑनलाईन वेबसाईटवर त्याची डिटेल माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही अर्ज केला नसेल तर आजच करू शकणार आहात कारण उद्यानंतर या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. 20 जुलै 2021 पासून या पदांसाठी अर्ज सुरू होते. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट असणार आहेत.
तुम्ही पोस्टाच्या साईटवर जाऊन तिथे अप्लाय करू शकता. मात्र अप्लाय करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. कारण तुमच्या एका चुकीमुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
पश्चिम बंगाल ग्रामीण सर्कलमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांना 10 वी पास असणं गरजेचं आहे. त्यामध्ये गणित आणि स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषय असणं अनिवार्य आहे. 60 दिवसांचा बेसिक कंप्यूटर कोर्स केलेला असायला हवा आणि त्याचं सर्टिफिकेट हवं. ज्या उमेदवारांकडे या सगळ्या गोष्टी आहेत तेच उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या 18 ते 40 वर्ष असणं बंधनकारक आहे. एससी/एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी ओबीसी आणि पीडब्ल्यूडी एससी/एसटी वर्गासाठी सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात भारतीय पोस्ट ऑफिसने (India Post Recruitment 2021) ऑफिशियल बेवसाईटवर निवेदनही दिलं आहे.
उमेदवारांची निवड 10वीच्या टक्क्यांवरून करण्यात येणार आहे. मेरिटलिस्टनुसार (India Post Recruitment 2021) उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. appost.in या ऑनलाइन साईटवरून इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढणंही गरजेचं आहे.