कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; गेल्या २४ तासांत देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक

कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

Updated: Jun 5, 2020, 11:46 AM IST
कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; गेल्या २४ तासांत देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक title=

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या Unlock 1 धोरणातंर्गत शुक्रवारपासून देशातील अनेक व्यवहार पुन्हा सुरु होत असतानाचा कोरोना रुग्णवाढीचा वेग काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९८५१ नवे रुग्ण आढळून आले. तर २७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे आता देशात प्रत्येक दिवशी तब्बल १० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. ही परिस्थिती धडकी भरवणार आहे. 

देशातील कोरोनाचे २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत, तरीही चाचण्यांच्या संख्येत घट

आतापर्यंत कोरोनातून लाखभरापेक्षा अधिक लोक बरे झाले असले तरी नव्या रुग्णांची झपाट्याने वाढणार संख्या मोठी अडचण निर्माण करु शकते. मुंबईसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आतापासूनच रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये बेडसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग असाच राहिल्यास आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची शक्यता आहे. 

देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला- राहुल गांधी

देशातील अनेक तज्ज्ञांनी जून आणि जुलै महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. मुंबई हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा ४२ हजारांच्या पलीकडे गेला असला तरी १७,२१३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या उपचार घेत असलेले २३,४०५ (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत धारावीचा वरचा क्रमांक असला तरी उपचाराखाली असलेल्या बाधित रुग्णांची संख्या शीव, वडाळा, कुर्ला, भायखळा आणि अंधेरी परिसरात अधिक आहे.