India Thermonuclear Weapon Test : जगभरात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे तणावाचं वातावरण आहेच. सोबतच आपला शेजारी देश चीनचं विस्तारवादाचं धोरण भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतं. एकीकडे चीनसारखा देश आणि दुसरीकडे पाकिस्तानसारखा कायम दहशतवाद्यांना शरण देणारा देश, यामुळे भारताला कायमच धोका राहिलाय (China Pakistan). अशात एकीकडे रशिया युक्रेन युद्धामुळे तर दुसरीकडे चीन आणि तैवान यांच्यातील सातत्याने तयार होणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात अणुयुद्धाची टांगती तलावर ( Nuclear Weapon) आहे. अशात भारताला अधिक शक्तिशाली देश म्हणून उभं राहण्यासाठी थर्मोन्युक्लिअर बॉम्बची आवशकता आहे, असं अमेरिकेच्या थिंकटॅंकचं ( Amrica Thinktank ) मत आहे. अशात नेमका हा थर्मो न्यूक्लिअर बॉम्ब असतो कसा? अणुबॉम्बपेक्षा हा बॉम्ब कसा वेगळा आणि किती पट घातक आहे, जाणून घेऊया.
थर्मो न्यूक्लिअर बॉम्बला हायड्रोजन बॉम्ब ( Hydrogen Bomb) किंवा H बॉम्ब असं देखील देखील बोललं जातं. यामध्ये अणुबॉम्बपेक्षा अधिक भीषण स्फोट ( Traditional Atom Bomb ) घडवून आणण्याची क्षमता असते. हा सामान्य अणु बॉम्बच्या तुलनेत अत्यंत शक्तिशाली आहे.
सध्या तयार करण्यात येणाऱ्या थर्मो न्यूक्लिअर बॉम्बमध्ये लिथियम-6 ड्यूटराईड फ्युजनचा इंधन म्हणून वापर केला जातो. याच्या स्फोटक शक्तीने एक स्वयंचलित अनियंत्रित चेन रिएक्शन तयार होते. ज्यामध्ये हायड्रोजनचे दोन अणु आणि हेलियमचा एक जड रेणू तयार होतो. यामुळे अतिशय प्रचंड उष्णता देखील तयार होते.
हायड्रोजन बॉम्ब किंवा ज्याला H बॉम्ब बोललं जातं, याचा स्फोट दोन टप्प्यांमध्ये होतो. सुरवातीच्या टप्प्यात युरेनियमच्या कमी मात्रेने सर्वसाधारण अणुविस्फोट होतो. चेन रिऍक्शन तयार करण्यासाठी हा सुरुवातीचा विस्फोट केला जातो. या स्फोटामुळे थर्मोन्युक्लिअर बॉम्बमधील चेन रिअक्शन ट्रिगर होते. या चेन रिएक्शनमुळे तापमान हे काही लाख अंश सेल्सियसपर्यंत पोहोचतं. या भयंकर स्फोटाच्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात रेडिएशन तयार होतं. या स्फोटानंतर दुसऱ्या फळीतील चेन रिएक्शन सुरु होते आणि युरेनियमच्या कंटेनरमध्येही मोठा स्फोट होतो. महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया एका सेकंदापेक्षा कमी वेळात पूर्ण होते.
या स्फोटाबाबतची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पारंपरिक अणु स्फोटाच्या तुलनेत हा स्फोट अनेक पटींनी ताकदवर असतो. जशी सूर्याची ऊर्जा काम करते त्याच पद्धतीने हा बॉम्ब देखील ऊर्जा उत्सर्जित करतो. एका धमाक्याने प्रकाश, उष्णता आणि विविध प्रकारचे रेडिएशन्स उत्सर्जित होतात. या स्फोटामुळे एक शॉकव्हेव देखील तयार होते, जी स्फोटाच्या जागेपासून अनेक किलोमीटर दूरवर हायपरसॉनिक वेगाने प्रवास करते. त्यामुळे यामध्ये येणाऱ्या प्रत्येक इमारती देखील नेस्तनाबूत होतात. या स्फोटापासून तयार झालेला प्रकाश अनेक किलोमीटर दुरूनही पाहता येऊ शकतो, ज्याने कायमचं अंध्यत्व देखील येऊ शकतं. यातील आणखी एक घातक गोष्ट म्हणजे याच्या उष्णतेमुळे आसपासचा सर्व भाग जळून जातो. ज्याने तुम्हाला आगीचं वादळ आल्यासारखं भासू शकतं. या स्फोटातून उत्सर्जित झालेली ऊर्जा हवा पाणी आणि मातीलाही दूषित करते.
American think tank recommends India conduct a thermonuclear test amid China and Pakistans nuclear policies