नवी दिल्ली : भारतामध्ये येत्या वर्षापर्यंत पहिले थिएटर कमांड (Theater Commands) बनणार आहे. जल, जमिन आणि वायुसेना या थिएटर कमांडचा हिस्सा होणार आहेत. युद्धप्रसंगी तिनही सैन्य दलामध्ये समन्वय ठेवण्यास थिएटर कमांड्सचा सर्वात चांगला उपयोग होतो. देशामध्ये २ ते ५ थिएटर कमांड बनवण्याची तयारी सुरु आहे. चीनसोबत झालेल्या तणावानंतर थिएटर कमांडर बनवण्याची तयारी वेगाने सुरु करण्यात आलीय.
युद्धावेळी तीन सैन्यात ताळमेळ राखण्यास कमांड खूप उपयोगी असते. इथे बनलेल्या रणनितीनुसार विरोधकांवर अचूक वार करणं शक्य होतं. सेना, वायुसेना आणि नौसेना एकत्र येऊन इंटीग्रेटेड थिएटर कमांड बनवण्याची तयारी वेगात सुरु असण्याचे हे एक कारण आहे.
भविष्यात थिएटर कमांड्स बनवले जातील असे देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बनल्यानंतर जनरल बिपिन रावत यांनी सांगितले होते. युद्धा दरम्यान विरोधकांना सळो की पळो करण्याची रणनिती बनवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.