नवी दिल्ली: भारत आणि चीन यांमध्ये डोकलाम मुद्द्यावरून होणाऱ्या वादामुळे सीमेवर तणाव वाढत आहे. या मुद्द्यावरून चीन मागे हटायला तयार नाही आणि भारत आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. आता वातावरण इतके तापले आहे की कधीही युद्ध होऊ शकते. अशावेळी युद्धाची स्थिती निर्माण झाली तर भारतीय वायुसेना चिनी लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेची विमाने चीनच्या PLAAF (पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स) वर कुरघोडी करण्यास अधिक सक्षम ठरतील, असा विश्वास आहे.
अभ्यासकांच्या मते जर भारत आणि चीनमधील वादामुळे तिबेटमध्ये दहशतीची परिस्थिती निर्माण झाल्यास या युद्धभूमीवरील परिस्थिती भारताच्या बाजूने असेल. याचा खुलासा भारतीय वायुसेनेच्या स्क्वाड्रन लीडर समीर जोशीने सादर केलेल्या दस्तावेजेेेत म्हटले आहे. हा दस्तावेज लवकरच प्रकाशित होईल. काही दिवसांपासून सिक्कीमच्या डोकलाम भागात होत असलेल्या भारत आणि चीनच्या वादावर हा पहिला भारतीय दस्तावेज आहे.
इंडियन डिफेन्स अपडेट वेबसाईटच्या वृत्तानुसार या दस्तावेजचे नाव 'The Dragon's Claws: Assessing China's PLAAF Today' हे आहे. ज्यामध्ये पूर्व स्क्वाड्रन लीडर जोशी यांनी भारतीय वायुसेना आणि चिनी वायुसेनेची तिबेटमध्ये असणाऱ्या परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. लवकरच प्रकाशित होणाऱ्या दस्तावेजानुसार तिबेट स्वायत्त क्षेत्रातील ऑपरेशनच्या अटीनुसार भारतीय वायुसेनेला चीनच्या तुलनेत अधिक यश प्राप्त झाले आहे. भारत आणि चीनच्या मध्ये वास्तविक नियंत्रण रेखेच्या उत्तर दिशेला स्वायत्त क्षेत्र आहे.
भारतीय वायुसेनेच्या श्रेष्ठ लढाऊ विमानांमधील मिराज 2000 चे फायटर पायलट जोशी यांनी यामागचे भौगोलिक कारण सांगितले. त्यांनी सांगितले की भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने चिनी लढाऊ विमानांपेक्षा अधिक सक्षम आहेत.
जोशी यांनी याचे मुख्य कारण सांगितले की, चीनचे मुख्य एयरबेस खूप उंचावर आहेत. तर दुसरीकडे तिबेटच्या स्वायत्त क्षेत्रात येणाऱ्या चीनी एयरक्राफ्टला विपरीत वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करावा लागणार आहे. ज्यामुळे चिनी एयरक्राफ्ट आणि सैन्य अभियानची क्षमता कमी होते. तिबेटच्या उंच भागात वाऱ्याचे घनत्व कमी असते. त्यामुळे चिनी लढाऊ विमानांची su-27, J-11 किंवा J-10 क्षमता कमी होते.
भारतीय वायुसेना उत्तर पूर्वेला असून (तेजपुर, कलाईकुंडा, छाबुआ आणि हाशीमारा) तिथून ऑपरेट होतं. या चारही एयरबेसची उंची तुलनेने कमी आहे. त्यामुळे या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन अगदी आतील भागात देखील ऑपरेशन करण्यास सक्षम आहे. याउलट चिनी लढाऊ विमानांना तिबेटच्या उंच क्षेत्रात काम करणे अनुकूल होणार नाही आणि त्यामुळे त्यांची क्षमता कमी होईल.
स्क्वाड्रन लीडर समीर जोशीच्या म्हणण्यानुसार, क्षेत्र, टेक्नॉलॉजी आणि ट्रेनिंग या तीन बाबतीत तिबेट आणि दक्षिणी जिनजियांग मध्ये भारतीय वायुसेनेला नक्कीच यश प्राप्त होईल. हे संख्याबळ PLAAF च्या यशाला कमीतकमी येणाऱ्या काही वर्षात रोखण्यास सक्षम आहे.