नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकबद्दल परदेश सचिव विजय गोखले यांनी एक पत्रकार घेऊन अधिकृत माहिती दिलीय. जम्मू-काश्मीरच्या पुलमवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर पाकिस्तान समर्थित 'जैश ए मोहम्मद'कडून दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. त्यावर प्रत्यूत्तर म्हणून मंगळवारी पहाटेच पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील 'जैश'च्या अनेक दहशतवादी तळांवर भारताकडून कारवाई करण्यात आली, असं त्यांनी म्हटलंय.
भारतानं पाकिस्तानवर मंगळवारी केलेल्या या हल्ल्यात मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा टॉप लीडर मौलाना युसूफ अजहर हादेखील ठार झाल्याची माहिती परदेश सचिव विजय गोखले यांनी दिलीय.
१४ जानेवारी रोजी पुलवामामध्ये पाक समर्थित जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला बहावलपूरमध्ये बसलेल्या जैशचा म्होरक्या मसूद अजहर आणि त्यांच्या साथीदारांनी घडवून आणला. पाकमध्ये असे शेकडो जिहादी कॅम्प सर्रास सुरू आहेत. पाकिस्तानकडून त्यांच्यावर कोणताही कारवाई केली जात नाही. इंटेलिजन्स इनपुटनुसार, जैशचे दहशतवादी इतरही भागांत आत्मघातकी हल्ले घडवून आणू शकतात. बालकोटमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत जैशच्या सीनिअर कमांडरसहीत अनेक दहशतवादी ठार जालेत. जैश ए मोहम्मदच्या कॅम्पना निशाण्यावर घेतच हे हल्ले करण्यात आले. यामध्ये कोणत्याही सामान्य नागरिकाला हानी पोहचणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली.
भारतीय वायुसेनेनं मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून सीमारेषेपलिकडील दहशतवादी तळांचा नायनाट केलाय. जवळपास १००० किलो स्फोटकांचा (payload) वापर या हल्ल्यात करण्यात आलं