भारतीय लष्करातील रुबाबदार घोडदळाबाबत मोठा निर्णय

निवृत्त अधिकाऱ्यांची नाराजी   

Updated: May 15, 2020, 04:25 PM IST
भारतीय लष्करातील रुबाबदार घोडदळाबाबत मोठा निर्णय title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारतीय लष्करात अतिशय रुबाबदार आणि गैरवशाली तुकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्वदल अर्थात घोडदळाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हं आहेत. येत्या काळात या दलाचं खास स्थान हे अवाढव्य रणगाडे घेणार आहेत. 

पुढील जवळपास पाच महिन्यांच्या कालावधीत हा प्रस्तावित बदल पूर्णत्वास जाणार आहे. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या ल़ॉकडाऊऩमुळं काही बंधनं आल्यामुळं ही वेळ दवडली जात आहे. 

सैन्याशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भल्यामोठ्या मशीन्सना तुकडीत आणण्यासाठीच्या बालचालीही सुरु झाल्या आहेत. या रणगाड्यांना अत्याधुनिक रुप देण्यात येत आहे. लष्करातील वाढीव खर्च कमी करत युद्धशक्ती वाढवण्यासाठी म्हणून नेमण्यात आलेल्या एका समितीनं याबाबती शिफारस केल्याची माहिती समोर आली.

सैन्यातील या तुकडीकडे फक्त काही समारंभ आणि औपचारिक कार्यक्रमांच्याच वेळी महत्त्वाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. त्यामुळेच या तुकडीविषयी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. या निर्णय़ावर आता सैन्यातून संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. निवृत्त सैन्यदल अधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर आळवला आहे. जयपूर आणि दिल्ली येथे असणारं हे ६१ घोडदळ आणि त्याची गौरवसाली परंपरा सैन्यातून नामशेष होऊ नये असाच सूर त्यांनी आळवल्याचं म्हटलं जात आहे. 

 

भारतात लॉकडाऊनमुळे किती फरक पडला?

 

आजवर देशाच्या सैन्यात असणाऱ्या विविध तुकड्या आणि त्यांच्याविशयी विशेष आत्मियता दिसून आली आहे. घोडदळाविषयीसुद्धा असंच चित्रं. आंतरराष्ट्रीय पाह़ुण्यांचनाा राष्च्रपती भवनात सलामी देण्यायपासून ते राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ततान दिनाच्या पथसंचलनात या दलाचा रुबाब पाहायला मिळतो. पण, येत्या काळात हे चित्र काही अंशी बदललेलं असण्याची शक्यता आहे.