Indian Coast Guard Recruitment 2023: 10 वी आणि 12 वी पास (10th And 12th Pass Job) व्यक्तींसाठी कोस्ट गार्ड (Coast Guard) म्हणून सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये (Coast Guard Recruitment) नाविक म्हणून नोकरभरती सुरु झाली आहे. या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची संधी 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना मिळणार आहे. या जागांसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) स्वीकारण्यास (Job Application) आजपासून सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती संबंधित वेबसाईठवर उपलब्ध असून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात...
कोर्ट गार्डमध्ये नाविक पदासाठी एकूण 255 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये नाविक जनरल ड्युच्या 225 जागा असून नाविक म्हणून भारतीय समुद्र सीमांसंबंधातील शाखांमध्ये 30 जणांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 16 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज कुठे करावा असा प्रश्न पडला असेल तर सरकारी वेबसाईटच्या माध्यमातून या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. joinindiancoastguard.gov.in या वेबसाईटवरुन संबंधित पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
अर्ज करणाऱ्या व्यक्तींचं किमान वय हे वय वर्ष 18 तर कमाल वयोमर्यादा 22 वर्षांची आहे. कमाल वयोमोर्यादेमध्ये आरक्षित उमेदवारांना सवलत देण्यात आली आहे. एससी आणि एसटी गटातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 5 वर्षांच्या वाढीव वयोमर्यादेची सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी वर्गातून अर्ज करणाऱ्यांसाठी 3 वर्षांची सूट कमाल वयोमर्यादेवर देण्यात आली आहे.
उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ऑनलाइन माध्यमातून लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये पास होणाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन या तीन टप्प्यांमधून निवडलं जाईल. तिसऱ्या टप्प्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आयएनएस चिक्लावर मेडिकल एक्झामिनेशन, ओरिजन डॉक्युमेंट्स सबमिशन या गोष्टींची पूर्तता करावी लागेल याच आधारावर ऑल इंडिया स्तरावरील मेरिट लिस्ट तयार केली जाईल. तसेच भरतीसंबंधीत अन्य माहितीसाठी तसेच नोटीफिकेशनसंदर्भातील माहिती तुम्ही येथे क्लिक करुन जाणून घेऊ शकता. या परीक्षेसाठी काही कागदपत्रांची ऑनलाइन पूर्तता करणे आवश्यक असून यासंदर्भातील माहिती संबंधित लिंकवर उपलब्ध असून ती नीट समजून घेण्याचं आवाहन कोर्ट गार्डच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.