'अभिनंदन' ! भारताचा वीर मायदेशी परतला

अटारी बॉर्डरवरुन अभिनंदनला भारतात परतले

Updated: Mar 1, 2019, 06:28 PM IST
'अभिनंदन' ! भारताचा वीर मायदेशी परतला title=

नवी दिल्ली : वीर विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले आहेत. संपूर्ण देशाच्या नजरा सकाळपासून वाघा बॉर्डरवर होत्या. वायुदलाच्या प्रतिनिधीमंडळाने विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानच्या ताब्यातून भारतात आणलं. सकाळपासून लोकं अभिनंदन यांच्या स्वागतासाठी बॉर्डरवर पोहोचत होते. आज बिटींग द रिट्रीट रद्द करण्यात आली असली तर लोकांची गर्दी कमी झालेली नव्हती. भारताच्या या वीरला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचा भारतीय वायुदलाला ताबा देण्यात आला. त्यानंतर त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण कागदपत्रांची प्रक्रिया केल्यानंतर त्यांना भारताकडे सोपवण्यात आलं आहे. अभिनंदनचं मिग 21 विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हल्ल्यात जमिनीवर पडलं. त्यानंतर अभिनंदन पाकिस्तानात जाऊन पडला. अभिनंदनने पाकिस्तानचं एक एफ-16 लढाऊ विमान पाडलं होतं.

बुधावारी सकाळी पाकिस्तानकडून विमानांच्या सहाय्यानं हल्ला चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले. तेव्हापासून अभिनंदन पाकिस्तानमध्ये होते. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ लढावू विमान जमीनदोस्त केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरूवारी संसदेत अभिनंदन यांना शुक्रवारी सोडण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशाभरात आनंदाचं वातावरण आहे. भारताने अभिनंदची सुटका कोणत्याही अटीशर्तींवर अवलंबून नसल्याचे सांगितले. भारताने केलेल्या दबावानंतर पाकिस्ताकडून अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. अभिनंदन यांची सुटका केल्याने तणाव कमी होणार असेल तर अभिनंदन यांना शांततेच्या मार्गाने सोडणार असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आलं आहे.

आई-वडिलांना सॅल्यूट 

चेन्नईहून दिल्लीला जाणारे विमान अर्ध्या रात्री गंताव्य ठिकाणी थांबले तेव्हा कोणीच बाहेर जाण्यासाठी घाई केली नाही. कारण सर्वांच्या नजरा भारतीय वायुसेनेचे कर्तबगार एअर कमांडर अभिनंदन यांच्या आई वडीलांकडे होत्या. एअर मार्शल (सेवानिवृत्त) एस वर्तमान आणि डॉ. शोभा वर्तमान यांच्या सन्मानार्थ उपस्थित प्रवाशांनी सॅल्यूट केला तसेच टाळ्यांच्या कडकडाटासह त्यांना सर्वात आधी उतरण्याचा मान दिला.