भारतीय टपाल बँकेची नवी सेवा, डिजिटल पेमेंट सेवा घरपोच

भारतीय टपाल खात्यातही आजपासून बँकेच्या सर्व सुविधा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल बॅंकेचा आज शुभारंभ केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 1, 2018, 07:52 PM IST
भारतीय टपाल बँकेची नवी सेवा, डिजिटल पेमेंट सेवा घरपोच title=

नवी दिल्ली : भारतीय टपाल खात्यातही आजपासून बँकेच्या सर्व सुविधा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल बॅंकेचा आज शुभारंभ केला. त्यामुळे देशातील सर्वात मोठी बॅंक म्हणून टपाल बॅंकेला मान मिळणार आहे. दरम्यान, पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवक शहरी आणि ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट सेवा पोहोचविणार आहेत.आजपासून भारतीय टपाल खाते देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक बनण्यासाठी सज्ज झाली आहे. आजपासून अनेक सेवांना सुरुवात करण्यात आलेय. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा मोफत दिल्या जाणार आहेत.

देशातल्या पोस्टल सेवेनं आज कात टाकलीय. यावेळी पंतप्रधान मोदींनी ही पोस्ट खात्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलंय. पोस्टल बँकेच्या माध्यमातून आता घरोघरी पत्र पोहचवणारे पोस्टमन बँकिंग सुविधाही पोहोचवणार आहेत. प्रत्येक पोस्टमनला बाय़ोमॅट्रिक तपासणी यंत्रणेसह सगळी महत्वाची यंत्रणा असेल. त्यामुळे प्रत्येक खातेदाराला त्याच्या खात्याचा घरबसल्या वापरता येणार आहेत. आजपासून ही सुविधा सुरु झालीय. देशात साधारण ३ लाख पोस्टमन काम करतात. त्यांच्या माध्यमातून गावागावात टपाल सेवा दिली जाते. घरोघरी पोहचलेली ही टपाल यंत्रणा वापरल्यानं आता देशातल्या कॅशलेस व्यवहारांना अधिकाधीक चालना मिळणार आहे. 

 

PM मोदी ने किया इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक का शुभारंभ, देशभर में होंगी 650 ब्रांच

देशात सध्याच्या घडीला १.५५ लाख पोस्ट कार्यालये आहेत. व्यवहारासाठी ६५० पेमेंट बॅंक त्यांना मदत करणार आहे. याअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत बचत खाते, २५ हजार रुपयांपर्यंत ५.५ टक्के व्याज, चालू खाते आणि थर्ड पार्टी इन्शूरन्स आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच तुमचा आधार नंबर हाच पेमेंट अॅड्रेस असेल.

पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवक शहरी आणि ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट सेवा पोहोचविणार आहेत. २०१५ मध्ये टपाल खात्याला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पेमेंट बॅंक म्हणून मान्यता दिली होती. आजपासून या सर्व सुविधा सुरु होणार आहेत.