Most Expensive Ticket Of Indian Railway: महाराजा एक्सप्रेस (Maharaja Train) ट्रेनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय रेल्वेचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक क्षणभर विसरले की ही ट्रेन आहे. याचं कारण म्हणजे या ट्रेनचा संपूर्ण डबा एखाद्या राजाची शयनकक्ष असल्याप्रमाणे सजवलेला आहे. त्याचं भाडे देखील इतके जास्त आहे की साधाराण व्यक्ती प्रवास करू शकत नाही. (Viral News)
खरं तर या ट्रेनचं नाव आहे महाराजा एक्सप्रेस. ही ट्रेन इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे देखील चालवली जाते. नुकताच या ट्रेन चा एक व्हिडिओ व्हायरल झाला जेव्हा इन्स्टाग्राम यूजर कुशाग्रानं हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती महाराजा एक्सप्रेस रूमचा दरवाजा उघडतो. तो या ट्रेनच्या डब्यात डायनिंग एरिया, शॉवरसह बाथरूम आणि दोन मास्टर बेडरूम देखील दाखवतो. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या एका तिकिटाची किंमत वीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. किंबहुना राजांची शाही खोली अशीच असावी असे वाटते. कारण त्याच्या सुविधाही अगदी तशाच आहेत. (Indian Railway)
हेही वाचा : Amitabh Bachchan यांना आवडते ही स्टार किड, KBC मध्ये केला खुलासा
महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी ट्रेन मानली जाते. (Indian Rail) रिपोर्ट्सनुसार, या ट्रेनमधील प्रवासी इंडियन पॅनोरमा, ट्रेझर ऑफ इंडिया, द इंडियन स्प्लेंडर आणि द हेरिटेज ऑफ इंडिया या चार मार्गांपैकी एक निवडू शकतात आणि सात दिवस कोणत्याही प्रवासाला जाऊ शकतात. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर या व्हिडीओच्या खाली 19 लाख 90 हजार 800 रुपये यासोबत जीएसटी द्यावा लागतो असे सांगितले. दरम्यान, ट्रेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (indian railway luxury train maharajas express inside video goes viral with king feel)