Indian Railway Recruitment | रेल्वेमध्ये 1600 पदांसाठी भरती होणार; असा करा अर्ज

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. 

Updated: Oct 17, 2021, 01:17 PM IST
Indian Railway Recruitment | रेल्वेमध्ये 1600 पदांसाठी भरती होणार; असा करा अर्ज

नवी दिल्ली : रेल्वे भरतीसेल (RRC)ने उत्तर आणि मध्य क्षेत्रात एनसीआर अलाहाबाद ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज जारी करणार आहेत. उमेदवारांना 2 नोव्हेंबर 2021 पासून 1 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर (rrcpryj.org)अर्ज करता येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी 15 ते कमाल 24 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.  उमेदवारांची वयाची गणना 1 डिसेंबर पासून करण्यात येणार आहे. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी कमाल वयाच्या मर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.  ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अधिकृत नोटिफिकेशननुसार रिक्त पदांची एकूण संख्या 1664 आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून कमीत कमी 50 टक्क्यांसह 10 वी आणि 12वी पास असणे अनिवार्य आहे. याशिवाय संबधित ट्रेडमध्ये आयटीआयची डिग्री आवश्यक आहे. शैक्षणिक योग्यतांच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन चेक करा.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकरण्यात येणार आहे. एससी, एसटी, पीडब्लुडी आणि महिला उमेदवारांसाठी आवेदन शुल्कात सूट असणार आहे.
पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2021 आहे.