Indian Railway Facts: भारतीय रेल्वे (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे. हे दळणवळणाचं असं एक साधन आहे ज्याचा वापर समाजातील प्रत्येक वर्गाकडून केला जातो. तुम्हीही कधी ना कधी रेल्वेनं प्रवास केला असेल. तुम्हाला हेसुद्धा ठाऊक असेल, की रेल्वे एका इंजिनाद्वारे नियंत्रित केली जाते. (Indian Railway what if loco pilot or driver falls asleep in a moving train)
रेल्वे इंजिनच्या डब्यात लोको पायलट असतो. जो ही रेल्वे चालवतो. थोडक्यात त्याच्याच हातात इतक्या प्रवाशांचा जीव असतो असं म्हणायला हरकत नाही. समजा याच लोको पायलटचा रेल्वे सुरु असतानाच डोळा लागला तर? मोठा अपघात होईल?
रेल्वेमध्ये असतात दोन लोको पायलट
रेल्वेनं एकाच वेळी हजारो प्रवासी प्रवास करत असतात अशा वेळी लहानशी चूकही मोठ्या अपघातात परावर्तित होऊ शकते. हाच अपघात टाळण्यासाठी रेल्वेमध्ये लोको पायलटसह एक दुसरा लोको पायलटही असतो. मुख्य लोको पायलटचा डोळा लागल्यास किंवा त्याला काही अडचण आल्यास मदतीसाठी असणारा लोको पायलट त्याची मदत करतो.
परिस्थिती जास्तच गंभीर असल्यास हा मदतनीस पुढच्या स्थानकापर्यंत ही माहिती पोहोचवतो आणि रेल्वे थांबवली जाते. ज्यानंतर रेल्वेचा मुख्य लोको पायलट बदलला जातो.
दोघंही झोपले तर?
आता तुम्ही म्हणाल, की दोघंही झोपले तर? असं काही घडण्याची शक्यता फारच कमी आहे. पण, दुर्दैवानं असं काही घडल्यास त्यासाठी रेल्वेच्या इंजिनामध्ये 'विजीलेंस कन्ट्रोल डिवाइस' असतं. रेल्वेचा लोको पायलट एका मिनिटाहून जास्त वेळ होऊनही कोणतीच प्रतिक्रिया देत नसेल तर पुढील 17 सेकंदांच्या आत ऑडियो विजुअल इंडीकेशन सुरु होतं. ज्याचं उत्तर तिथं असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यानं देणं अपेक्षित असतं. असं न झाल्यास रेल्वेला ऑटोमॅटिक ब्रेक लागण्यास सुरुवात होते.
आपोआप थांबते धावती रेल्वे
रेल्वेमध्ये वरील प्रक्रियेमध्ये निर्धारित वेळेत उत्तर न मिळाल्यास 1 किमीच्या अंतरातच रेल्वे आपोआप थांबते. अशा वेळी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये उपस्थित असणाऱ्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळते आणि मोठे अपगात टाळले जातात.