नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. प्रवासासोबत तुम्हाला सामान तुमच्या घरपोच देणार आहे. पहिल्यांदा भारतीय रेल्वेतर्फे बॅग्ज ऑन व्हील सेवा सुरु होत आहे.
प्रवासादरम्यान सामान ट्रेनमधून घरी पोहोचवले जाणार आहे. सुरुवातीला ही सेवा नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन, दिल्ली छावनी, दिल्ली रोहिल्ला, गाझियाबाद आणि गुरुग्राम रेल्वे स्थानकावर उपलब्ध असेल. ट्रेन स्टेशनमधून रवाना होण्याआधी तुमचं सामान ट्रेनपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रेल्वेची असेल. डोअर टू डोअर सेवेसाठी प्रवाशांना वेगळे शुल्क द्यावे लागणार आहे.
ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग आणि एकट्याने प्रवास करणाऱ्यांना सामानामुळे प्रवासादरम्यान अडचणी येतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे नेहमी प्रयत्न करत असते. या हेतूने काम करत असतानाच दिल्ली विभागाने बॅग्ज ऑन व्हील सेवा देण्याचा निर्णय घेतल्याचे उत्तर आणि उत्तर मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव चौधरी यांनी सांगितले.