यापुढे रेल्वे स्टेशनवर असाल तर मोबाइल डेटाची काळजी करू नका...

8500 रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा पुरवली जाणार आहे.

Updated: Jan 7, 2018, 05:30 PM IST
यापुढे रेल्वे स्टेशनवर असाल तर मोबाइल डेटाची काळजी करू नका... title=

नवी दिल्ली : 8500 रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा पुरवली जाणार आहे.

सर्व रेल्वे स्टेशनवर वायफाय

भारतभरातील सर्व  म्हणजे जवळपास ८,५००  रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा पुरवली जाणार आहे.  यात ग्रामीण तसंच दुर्गम भागातील रेल्वे स्टेशनचासुद्दा समावेश असणार आहे. या उपक्रमावर तब्बल ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

डिजीटल भारत

केंद्र सरकारची डिजीटल भारत ही एक महत्वकांक्षी योजना आहे. त्याचाच भाग म्हणून सध्या २१६ मोठ्या रेल्वे स्टेशनवर वायफाय सेवा पुरवली जातेय. इंटरनेट सेवा दैनंदिन व्यवहारात खूप महत्वाची झाली आहे. त्यामुळेच ती पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.

मार्च २०१९ पर्यंत प्रकल्प पूर्ण

६०० रेल्वे स्टेशनांवर मार्च २०१८ पर्यंत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर सर्वच्या सर्व म्हणजेच जवळपास ८,५०० रेल्वे स्टेशनवर मार्च २०१९ पर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. भारत सरकारच्या डिजीटल भारत योजनेला पुढे नेण्याचा हा प्रयत्न असेल.