देशात कोरोना रुग्णांची संख्या ६५ लाखांवर; मिळू शकते दिलासादायक बातमी

देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर तब्बल १ लाखांच्या घरात पोहोचला आहे.     

Updated: Oct 4, 2020, 12:56 PM IST
देशात कोरोना रुग्णांची संख्या ६५ लाखांवर; मिळू शकते दिलासादायक बातमी  title=

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोना रुग्णांनी ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ६५ लाखांवर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ९४० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे देशात कोरोना या धोकादायक विषाणूमुळे मृत पावलेल्यांची संख्या १ लाख १ हजार ७८२वर पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७४ इतकी आहे.

सध्या देशात ९ लाख ३७ हजार ६२५ रुग्ण उपचार घेत आहेत . त्याचप्रमाणे ५५ लाख ९ हजार ९६७ रुग्णांनी या धोकादायक विषाणूवर मात केली आहे. देशात आतापर्यंत सात कोटी ८९ लाख ९२ हजार ५३४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत,  तर शनिवारी ११ लाख ४२ हजार १३१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असून दिलासा देणारी बाब समोर येत आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आज देशात कोरोना लस कधी दाखल होणार याची ब्लू प्रिंट सादर करणार आहेत. आज त्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलणार आहेत.