पाच वर्षात बॅंकांमध्ये ६१,२६० कोटी रूपयांचा घोटाळा; आरबीआयचा खुलासा

गेल्या पाच वर्षात सरकारी बॅंकांमध्ये ८,६७० प्रकरणांमध्ये तब्बल ६१, २६० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) एका आकडेवारीत म्हटले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 17, 2018, 08:35 AM IST
पाच वर्षात बॅंकांमध्ये ६१,२६० कोटी रूपयांचा घोटाळा; आरबीआयचा खुलासा title=

नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षात सरकारी बॅंकांमध्ये ८,६७० प्रकरणांमध्ये तब्बल ६१, २६० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) एका आकडेवारीत म्हटले आहे.

 हे काही पहिलेच प्रकरण नाही.

अब्जाधिशांनी बॅंकांचे पैसे हडप करणे आणि त्याचा सर्वासामान्या कष्टकरी जनतेला फटका बसने आपल्या देशात नवे राहिले नाही. भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक असलेल्या पीएनबीमध्ये  (पंजाब नॅशनल बॅंक) नीरव मोदीने केलेला घोटाळा उघडकीस आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. पण, अशा प्रकारे फसवणूक होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही.

बॅंकांना तब्बल ६१,२६० कोटी रूपयांचा चुना 

माहिती अधिकार कायद्याखाली रॉयटर्स नावाच्या वृत्तसंस्थेने आरबीआयकडून मिळवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार, ३१ मार्च २०१७ पर्यंत गेल्या पाच वर्षात बॅंकांना तब्बल ६१,२६० कोटी रूपयांचा चुना लागला आहे. हा फटका एकूण ८,६७० प्रकरणांमध्ये बसला आहे.

भारतात कर्ज घोटाळा त्या प्रकरणांना म्हटले जाते, ज्या प्रकरणात कर्जदार पैसे घेऊन जाणीवपुर्वक बॅंकांना धोका देतो. तो कर्जाची परतफेड करत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना फटका बसतो. बॅंका आर्थिक अडचणीत येतात.

घर्जघोटाळ्यांमुळे गोत्यात येणाऱ्या बॅंकांची पातळी गेल्या वर्षी १४९ अरब डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बॅंक घोटाळ्यांमध्ये अत्यंत वेगाने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३मध्ये ६५७ कोटी रूपयांचा कर्ज घोटाळा झाला. तर सुरू आर्थिक वर्षात हेच प्रमाण १७,६३४ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले. यात पीएनबीतील घोटाळ्याची रक्कम मिळवली नाही.