नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसक झडपेनंतर सध्या अधिक तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या या संघर्षानंतर जवळपास १८ जवानांना लेहमधील रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं. कर, उर्वरित ४० जवानांवर सैन्याच्या इतर रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. दोन्ही राष्ट्रांच्या लष्करामध्ये झालेली हिंसक झडप आणि त्यानंतरचे सर्व परिणाम पाहता आधीच चिंताग्रस्त वळणावर असणाऱ्या या दोन्ही देशांचं नातं आणखी बिनसय. दरम्यान दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे. या सर्व मुद्द्यांवर आजची चर्चा अवलंबून असेल असे सांगण्यात येतंय.
सीमा भागात चीनच्या वाढत्या हालचाली, तणावाची परिस्थिती आणि लष्कराची वाढणारी कारवाई पाहता आता भारताकडून सैन्याला काही महत्त्वाचे आदेश दिले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह सैन्याच्या तिन्ही तुकड्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. ज्यानंतर गरज भासल्यास सीमेवर परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला शस्त्र वापरण्याची मुभा दिली आहे. सध्या सीमेच्या दोन्ही बाजुस भारत आणि चीनचे प्रत्येकी हजार सैनिक आहेत.
फक्त लष्करच नव्हे, तर ऩौदल आणि वायुदलालाही या परिस्थितीमध्ये सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असाधारण स्थितीत बंदुका वापरण्याचे आदेश देण्यासोबतच सैन्याच्या तिन्ही तुकड्यांच्या सुसज्जतेचा आढावाही घेण्यात आला. इतकंच नव्हे तर चीनसोबतच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये आता हवाई दलालाही महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. हे देश म्हणजे सुट्ट्या रद्द करण्याचे. सद्यस्थितीला परिस्थितीची गरज पाहता हवाई दलातील जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
काही तासांसाठी झालेल्या संघर्षामध्ये पाण्यात बुडण्यामुळं, अतीथंडीमुळं जवानांना बऱ्याच जखमा झाल्याचं उघडल झालं आहे. लेहमधील सोनम नरबू मेमोरियल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका ड़ॉक्टरांनी गोपनीयतेच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला महत्त्वाची माहिती दिली. शहीद जवानांचे मृतदेह पाहता त्यावरील जखमा संघर्ष किती मोठा आणि हिंसक स्वरुपाचा होता याची प्रचिती देतात असं सांगितलं. धारदार शस्त्राचे वार आणि बरगड्यांना लागलेला मार पाहता बहुतांश जवानांची हीच परिस्थिती पाहायला मिळाल्याचंही त्यांनी उघड केलं.