close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इंदूरच्या भाजप आमदाराची गुंडगिरी, अधिकाऱ्यांना बॅटनं मारहाण

 कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भर रस्त्यात बॅटनं मारहाण

Updated: Jun 26, 2019, 05:29 PM IST
इंदूरच्या भाजप आमदाराची गुंडगिरी, अधिकाऱ्यांना बॅटनं मारहाण

इंदूर : इंदूरचे भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र असलेल्या आकाश यांनी मोडकळीस आलेल्या इमारतीवर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भर रस्त्यात बॅटनं मारहाण केली. इंदूर शहरातल्या गंजी कंपाऊंडमध्ये एक मोडकळीस आलेल्या इमारतीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आले होते. त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी आकाश विजयवर्गीय यांनी दबाव टाकला होता. मात्र हे अधिकारी कारवाईवर ठाम असल्यामुळे आकाश यांनी थेट या अधिकाऱ्यांवर हात उचलला.

धक्कादायक गोष्ट म्हणजे या आमदाराने भररस्त्यात या अधिकाऱ्यांना लोकांसमोर बॅटने अमानुष मारहाण केली. एवढंच नव्हे तर महापालिकेच्या गाड्यांचीही आमदार आकाश आणि त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. आकाश विजयवर्गीय आणि इतर दहा जणांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश विजयवर्गीय यांना पोलिसांनी अटक करुन कोर्टात सादर केलं आहे.