मुंबई : Infosys Recruitment: : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023 मध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून 55 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. इंन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांनी म्हटले आहे की, टेक्नॉलॉजी क्षेत्रातील इंजिनिअरिंग आणि सायंन्स ग्रॅज्युएटच्या उमेदवारांची या क्षेत्रात मोठी मागणी आहे. परंतू त्यासाठी खूप कमी कालावधीत नवीन स्किल्स शिकता यायला हवे.
पारेख यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, आर्थिक वर्ष 22-23 मध्ये आम्ही 55 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहोत. पुढील वर्षी त्याहून अधिक जणांची भरती करण्यात येणार आहे.
त्यांनी म्हटले आहे की, 2022मध्ये इंफोसिसच्या वार्षिक महसूलात 20 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
त्यामुळे फ्रेशर्सला कंपनीमध्ये चांगल्या संधी मिळू शकणार आहेत.
पारेख यांनी म्हटले की, कंपनी कर्मचाऱ्यांच्या स्किल्सवर विशेष लक्ष देते. इन्फोसिस आपल्या कर्मचाऱ्याला फ्लोअरवर पाठवण्याआधी 4-6 महिने ट्रेनिंग देते.
याशिवाय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट स्किल्स अपडेट करण्यासाठी सर्व रिस्किलिंग प्रोग्राम चालवत आहे.