नवी दिल्ली: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान भारत सरकार सतर्क झालं आहे. भारतात 3 ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवेबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 38 देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका पसरला आहे. भारतातही ही त्याचा धोका वाढल्याने आता सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 डिसेंबरनंतर आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार सुरू होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सरकारने याबाबत सध्यातरी हा निर्णय स्थगित केला आहे.
एविएशन रेग्युलेटर DGCA कडून मिळालेल्या माहितीनुसार कॉमर्शियल इंटरनेशनल पॅसेंजर सर्व्हिस सुरू करण्याची पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. 23 मार्च 2020 पासून कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे.
कोरोना ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंटमुळे 38 देशांची झोप उडाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.तसेच ओमिक्रॉन प्रकारावर आढावा बैठक घेतली
अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याच्या योजनांवर पुनर्विचार करण्याचा विचार करावा असं सांगण्यात आलं आहे.डीजीसीएने यासाठी एक नवीन परिपत्रक जारी केले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने माहिती दिली की कॉमर्शियल इंटरनेशनल पॅसेंजर सर्विस पुन्हा सुरू कऱण्याबाबतची तारीख लवकरच कळवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.