जेव्हा किंग कोबरा अटॅक मोडमध्ये येतो... पुढे या तरुणासोबत काय घडलं पाहा व्हिडीओ

तो या सापाला त्याच्या शेपटीकडून वारंवार पकडण्याचा प्रयत्न करु लागतो.

Updated: Dec 4, 2021, 05:05 PM IST
जेव्हा किंग कोबरा अटॅक मोडमध्ये येतो... पुढे या तरुणासोबत काय घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई : सापाला पाहून बरेच लोकं घाबरतात, त्यात किंग कोब्रा हा सगळ्यात विषारी सापांपैकी एक आहे. ज्याला पकडताना साप पकडणारे देखील खूप काळजी घेतात. कारण जर या सापाला राग आला तर तो तुम्हाला दंश करु शकतो. त्यामुळे या सापाच्या नादाला कोणा लागत नाही. त्याला पकडणे म्हणजे स्वत:चा जीव स्वत:च्या हाताने धोक्यात घालणे.  किंग कोब्राचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो खूपच धक्कादायक आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक माणूस एका महाकाय कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यानंतर साप चिडतो आणि या तरुणावर हल्ला करतो.

मात्र तरुणही जिद्दी आहे. तो या सापाला त्याच्या शेपटीकडून वारंवार पकडण्याचा प्रयत्न करु लागतो.

पण हा कोब्राही जिद्दीवरती उतरतो आणि या तरुणाला आपला फणा दाखवून त्याच्यावर हल्ला करतो. अशा वेळी आणखी एक तरुण याच्या मदतीला येतो आणि सापाला शेपटीने पकडतो. त्यानंतर हा पहिला तरुण मोठ्या धाडसाने या सापाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो.

काही मिनिटांच्या मेहनतीनंतर हा तरुण त्यासापाला तोंडाकडून पकडतो आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जातो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा साप किती लांब आहे.

@Animal_World या ट्विटर हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला समजेल की, किंग कोब्रा किती धोकादाय आहे आणि तो कशापद्दतीने माणसांवरती आक्रमक होऊ शकतो. मात्र हा व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला याची पुष्टी झालेली नाही. पण हा व्हिडीओ पाहून लोकांना एक गोष्ट तर स्पष्टपणे समजली की, कोब्रापासून दूर राहणेच योग्य आहे.