जाणून घ्या कोण आहेत जयराम ठाकूर

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. जयराम ठाकूर पुढचे 5 वर्ष राज्याची कमान सांभाळणार आहेत. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 24, 2017, 03:23 PM IST
जाणून घ्या कोण आहेत जयराम ठाकूर title=

शिमला : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. जयराम ठाकूर पुढचे 5 वर्ष राज्याची कमान सांभाळणार आहेत. 

5 वेळा आमदार

जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशमधून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1998 मध्ये पहिल्यांदा ते आमदारा म्हणून निवडून आले होते. जयराम थकुर हिमाचल प्रदेशच्या राजकारणात एक मोठा चेहरा म्हणून उद्यास आले आहेत. जयराम ठाकूर यांचा जन्म 6 जानेवारी 1965 रोजी मंडी जिल्ह्यातील टांडी येथे झाला. 

पक्षाचे मजबूत नेते

जयराम ठाकूर यांनी विद्यार्थी असतांना आपला राजकीय प्रवास सुरू केला. जयराम हे एका गरीब कुटुंबातून आले आहेत. संघटनेत ते एक मजबूत नेते मानले जातात. 1998 मध्ये आपली पहिली निवडणूक त्यांनी जिंकली. ठाकुर हे हिमाचल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. जयराम ठाकूर आरएसएसच्या शाखेत मोठे झाले आहे.

समाजावर पगडा

धूमल सरकारमध्ये ते ग्रामीण विकास मंत्री होते. जयराम ठाकूर हे क्षत्रिय समाजातून येतात. आपल्या समाजावर त्यांची मोठी पकड आहे. हिमाचल प्रदेश भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. सामान्य लोकांमध्येही त्यांची लोकप्रियता कायम आहे. हिमाचलच्या अतिशय थंड क्षेत्रांत जाऊन त्यांनी पक्ष बांधणी केली. जेथे कोणीच जायला तयार नव्हतं.

गरीब कुटुंबात जन्म

जयराम ठाकूर हे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांच्या जवळचे मानले जातात. जयराम ठाकूर हे जेठुराम ठाकूर यांचे पुत्र आहेत. डॉ. साधना ठाकुर त्यांच्या आईचं नाव आहे. गरीब कुटुंबातून जयराम ठाकूर यांनी राजकारणाला सुरुवात केली.