महिन्याला 50,000 रुपये कमावयचे आहेत? या पाच बिझनेसमध्ये गुंतवा फक्त 10-15 हजार रुपये

तणावपूर्ण नोकरी, महिन्याचा कमी पगार आणि आर्थिक चणचण यामुळे अनेक जण व्यवसाय सुरु करण्याचा विचार करतात. पण पुरेसं भांडवल नसल्याने हात आखुडता घेतात.

Updated: Sep 6, 2022, 08:44 PM IST
महिन्याला 50,000 रुपये कमावयचे आहेत? या पाच बिझनेसमध्ये गुंतवा फक्त 10-15 हजार रुपये title=

Business Idea:  तणावपूर्ण नोकरी, महिन्याचा कमी पगार आणि आर्थिक चणचण यामुळे अनेक जण व्यवसाय सुरु करण्याचा विचार करतात. पण पुरेसं भांडवल नसल्याने हात आखुडता घेतात. तरीही अनेक जण व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नशील असतात. कोणताही व्यवसाय छोट्या किंवा मोठा नसतो. फक्त तो व्यवसाय करण्याची जिद्द असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अतिरिक्त कमाईसाठी अशा काही व्यवसायांची यादी सांगणार आहोत. या व्यवसायातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 ते 15 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

भाजी किंवा फळ व्यवसाय (Vegetable Business):  व्यवसाय करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. 5 ते 10 हजार रुपयांमध्ये तुम्ही अगदी सहज सुरुवात करू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायात नफ्याची क्षमता जास्त आहे आणि नफ्याची टक्केवारीही जास्त आहे.

फुलांचा व्यवसाय (Flower Business): हा व्यवसाय करूनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.  याद्वारे तुम्ही दररोज 2 ते 4 हजारांपर्यंत सहज कमाई करू शकता.

फास्ट फूड व्यवसाय (Fast Food Business): आजकाल लोकांना खाण्याची खूप क्रेझ आहे. तुम्ही फास्ट फूड कॉर्नरही सुरू करू शकता. चाउमीन, बर्गर, फिंगर-चिप्स आणि मोमोज इत्यादींचा व्यवसाय करू शकता. तसेच ठिकठिकाणी ब्रांच देखील ओपन करू शकता.

कपडे धुण्याचा व्यवसाय (Laundry Business): शहर असो की खेडे, सर्वत्र लाँड्री व्यवसायाचा अभाव दिसून येतो. अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरूनही करू शकता.

लोणचे बनवण्याच व्यवसाय (Pickle Making Business): लोणच्याच्या व्यवसायातूनही तुम्ही पैसे कमवू शकता. लोणच्याचा व्यवसाय माणूस फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकतो. लोणच्याच्या व्यवसायात उत्पादनाची मागणी वाढल्यास महिन्याला किमान 25 हजार ते 30 हजार रुपयांचा नफा मिळू शकतो.