Sunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते?

Sunday Holiday: काही देशांमध्ये शुक्रवारी पण आपल्याच देशात रविवारी सुट्टी असते, असं का याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?  

Updated: Nov 27, 2022, 07:43 AM IST
Sunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते? title=
sundays are decided to choose as holiday Why is Sunday a holiday intresting reason nmp

Why is Sunday a holiday : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस...लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच रविवारची (Sunday) वाट पाहत असतात. कारण Sunday is holiday...अनेकदा घरात लहान मुलं शाळेत (school) जायला कंटाळा करत असेल किंवा आपल्यालाही कधी तरी ऑफिसला (Office) जायचा कंटाळा येतो तेव्हा आपण सहज बोलू जातो. अरे यार रविवारीच का असते सुट्टी (holiday)...सोमवार (monday), मंगळवार (tuesday) काही नाही. पण याचा खरंच कधी विचार केला आहे का?, रविवारची का असते सुट्टी आणि कोणी ठरवलं रविवार हा सुट्टीचा दिवस असेल ते. आज आपण याबद्दल जाणून घेऊयात...

रविवारच्या सुट्टी मागे कारणं?

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन (ISO) नुसार रविवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो. ही मान्यता 1986 मध्ये दिली गेली आहे. पण त्यापूर्वीपासूनच रविवार हा दिवस सुट्टी म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. तसं पाहाता रविवारची सुट्टी जाहीर करण्यामागे अनेक कारणं आहेत. (sundays are decided to choose as holiday Why is Sunday a holiday intresting reason)

हेही वाचा - Weight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा

 सन-डे असं नाव

ओरिसा पोस्टच्या रिपोर्टनुसार, रविवारच्या संदर्भात अनेक समजुती आहेत. जसं की, प्राचीन संस्कृतीत सूर्याच्या म्हणजेच सूर्याच्या पूजेला खूप महत्त्व आहे. हळूहळू हा दिवस सूर्याच्या उपासनेशी जोडला जाऊ लागला आणि तो एक शुभ दिवस मानला जाऊ लागला. म्हणून या दिवसाला  सन-डे (Sun-day) असं पडलं.

भारतात रविवारची सुट्टी कोणी जाहीर केली? (Who declared Sunday holiday in India)

ब्रिटिश राजवटीत भारतीयांना सात दिवस काम करण्याची सक्ती करण्यात आली. सततच्या कामामुळे शरीर अशक्त होत होतं. एवढंच नाही तर त्यांच्या जेवणाची वेळही ठरलेली नव्हती, त्याचा परिणामी आरोग्यावर व्हायला लागला.  म्हणून 1857 साली कामगार नेते मेघाजी लोखंडे (Meghaji Lokhande) यांनी शारीरिक थकवा दूर व्हावा म्हणून कामगारांना दिलासा देण्याचा मुद्दा उपस्थित केला. मेघाजी म्हणाले की, या लोकांना आठवड्यातून एक दिवस विश्रांती मिळावी जेणेकरून त्यांना आराम वाटेल. सततच्या संघर्षानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि 10 जून 1890 रोजी ब्रिटिश सरकारने रविवारची सुट्टी निश्चित केली. अशा प्रकारे भारतात रविवारी सुट्टीचा सुरु झाली. 

मग प्रश्न पडतो की शाळांनीही हा दिवस का निवडला?

त्याचा संबंध देखील ब्रिटिश राजवटीशीही आहे. खरंतर, भारतात बहुतेक तेच नियम येथे लागू झाले आहेत, जे ब्रिटनमध्ये दीर्घकाळ चालत आले होते. 1986 मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेने रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्यामागे ब्रिटिशांचा हात असल्याचं मानलं जातं. ब्रिटनच्या शाळांमध्ये रविवारची सुट्टी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ब्रिटनच्या गव्हर्नर जनरलने सर्वप्रथम मांडला होता. या दिवशी मुलांनी घरी आराम करून काही सर्जनशील काम करावे, असं कारण सांगण्यात आलं. हळूहळू हाच नियम भारतातही लागू झाला.

या देशांनी शुक्रवारचा दिवस सुट्टी म्हणून निवडला

जगातील अनेक देशांनी रविवारऐवजी शुक्रवारचा (friday) दिवस सुट्टी म्हणून निवडला, कारण तिथे हा दिवस देवाची पूजा मानला जातो. त्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती, इराण, इराक, येमेन, कुवेत, इस्रायल, लिबिया, ओमान, इजिप्त, सुदान यांसारख्या अनेक देशांचा समावेश आहे.  कदाचित त्यामुळेच भारतातही मिशनरी शाळांमध्ये गुरुवारची सुट्टी असते. कारण ख्रिश्चन समाजात गुरुवारी (thursday) प्रार्थनेचा दिवस असतो.