IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑइलमध्ये 10वी/12वी पास उमेदवारांसाठी 1968 पदांसाठी भरती

 तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 1968 पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. 

Updated: Oct 24, 2021, 08:56 AM IST
IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑइलमध्ये 10वी/12वी पास उमेदवारांसाठी 1968 पदांसाठी भरती

मुंबई : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 1968 पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. आयओसीएलच्या पदांसाठी 10 वी / 12 वी, बीए, बीएससी, बीकॉम आणि डिप्लोमाचे उमेदवार अर्ज करू शकतील. भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख 12 नोव्हेंबर 2021 ही आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती उत्तरप्रदेश, बिहार, आसाम, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये केल्या जातील. आयओसीएलतील भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.iocl.com वर जाऊन अर्ज करू शकताता. उमेदवारांना सल्ला आहे की, त्यांनी नोटिफिकेशन पूर्ण वाचल्यानंतरच अर्ज करावा. उमेदवारांकडून चुकीचा भरण्यात आलेला फॉर्म एक्सेप्ट केला जाणार नाही. 

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख 22 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2021
एकूण रिक्त संख्या 1968

अर्जासाठी योग्यता
वेगवेगळ्या पदांप्रमाणे आर्हता गरजेची आहे. यासंबधी अधिकृत नोटिफिकेशन तपासणे गरजेचे आहे.
इच्छुक उमेदवारांनी www.iocl.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.