शशिकलांच्या VIP तुरुंगवारीची पोलखोल करणारी महिला अधिकारी अडचणीत

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या शशिकला सध्या तुरुंगात आहेत. परंतु, शशिकला तुरुंगात असूनही कशा पद्धतीनं ऐशोआरामात जगत आहेत याचा खुलासा आयपीएस अधिकारी डी. रुपा यांनी केला होता. त्यानंतर आता या महिला अधिकारी अडचणीत सापडल्यात. 

Updated: Nov 30, 2017, 01:39 PM IST
शशिकलांच्या VIP तुरुंगवारीची पोलखोल करणारी महिला अधिकारी अडचणीत title=

चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या शशिकला सध्या तुरुंगात आहेत. परंतु, शशिकला तुरुंगात असूनही कशा पद्धतीनं ऐशोआरामात जगत आहेत याचा खुलासा आयपीएस अधिकारी डी. रुपा यांनी केला होता. त्यानंतर आता या महिला अधिकारी अडचणीत सापडल्यात. 

डी. रुपा यांचे सिनिअर अधिकारी आणि माजी वरिष्ठ अधिकारी एच एन सत्यानारायण यांनी २० करोड रुपयांच्या मानहाणीचा दावा रुपा यांच्यावर दाखल केलाय. 

या संदर्भात माजी तुरुंग डीजी सत्यनारायण यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्र आणि एका टीव्ही चॅनलवरही खटला दाखल केलाय. 

डी रुपा यांच्या म्हणण्यानुसार, शशिकला यांनी दोन करोड रुपयांची लाच देऊ करून सत्यनारायण यांना आपल्या बाजूने केलं होतं. त्यानंतर शशिकला यांना तुरुंगातच व्हीआयपी ट्रिटमेंट मिळणं सुरू झालं... रुपा यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या.